ठळक मुद्देमिनाक्षी शेषाद्रीने हिरो, बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

मिनाक्षी शेषाद्रीचे निधन झाले असल्याच्या बातम्या काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या बातम्या संपूर्णपणे चुकीचे असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्यानंतर आता मिनाक्षीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो तिनेच सोशल मीडियावर पोस्ट केला असून यात ती खूपच छान दिसत आहे.

मिनाक्षीने कालच तिचा हा फोटो पोस्ट केला असून यात ती योगा करताना दिसत आहे. लाल रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाच्या पँटमध्ये या फोटोत तिला आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोत मिनाक्षी खूपच छान दिसत असल्याचे तिचे फॅन्स तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.  

मिनाक्षी शेषाद्रीने हिरो, बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला जुर्म आणि दामिनी या चित्रपटांसाठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मिनाक्षीने १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. त्याकाळात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मिनाक्षीची गणना केली जात असे. त्यामुळे तिने बॉलिवूड सोडल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण मीनाक्षीने लग्न केल्यानंतर चित्रपटांमध्ये काम न करता तिच्या खाजगी आयुष्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.

मिनाक्षीचे लग्न हरिश मैसूर यांच्यासोबत झाले असून ते इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. ते परदेशात स्थायिक आहेत. त्याचमुळे मिनाक्षी गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातच राहाते. बॉलिवूडपासून दूर राहून ती आपल्या पतीला आणि कुटुंबियांना वेळ देत आहे. ती अभिनय क्षेत्रात नसली तरी आपली नृत्याची आवड जोपासत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bollywood star Meenakshi Seshadri Here's how she looks now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.