ठळक मुद्देप्रियंका चोप्रा हिनेही लॉस एंजिल्समध्ये ‘करवा चौथ’ सेलिब्रेट केला.

 सगळीकडे करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. बॉलिवूड अभिनेत्रींनीही पतीच्या दीघार्युष्यासाठी हे व्रत केले. प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय बच्चन आदींनी ‘करवा चौथ’चे व्रत ठेवले.

अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहली याच्या दीर्घायुष्यासाठी ‘करवा चौथ’चे व्रत केले. विशेष म्हणजे, विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्कासोबत करवा चौथचा उपवास केला. यावेळचा फोटोही विराटने शेअर केला आहे.  विराट कोहली आणि अनुष्काने 11 डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले होते.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेही पती राज कुंद्रासाठी ‘करवा चौथ’चे व्रत केले. राजचे आशीर्वाद घेतानाचा फोटो तिने शेअर केला आहे.

रवीना टंडनने हिने ‘करवा चौथ’ साजरा केला.


 ‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रीया सरन हिनेही पती एंड्रे कोसचीव यांच्यासोबत बार्सिलोना येथे ‘करवा चौथ’चे व्रत केले. एका फोटो एंड्रे श्रीयाला किस करताना दिसतोय.

ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन सोनाली बेंद्रे आदींनी एकत्र येत ‘करवा चौथ’ साजरा केला. यावेळी सगळ्या जणी पारंपरिक रूपात दिसल्या.

प्रियंका चोप्रा हिनेही लॉस एंजिल्समध्ये ‘करवा चौथ’  सेलिब्रेट केला. प्रियंकाचा पती निक जोनास सध्या टूरवर आहे. प्रियंका निकच्या कॉन्सर्टमध्ये ‘करवा चौथ’ सेलिब्रेट करण्यासाठी पोहोचली. आजचा ‘करवा चौथ’ मी कधीच विसरणार नाही, असे तिने फोटो शेअर करताना लिहिले.

बिपाशा बासू हिने पतीसाठी ‘करवा चौथ’चे व्रत केले.


Web Title: bollywood celebration karva chouth, anuska sharma, priyanka chopra, aishwarya rai karva chouth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.