bhumika chawla was part of Hip Hip Hurray serial | भूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात

भूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात

हिप हिप हुर्रे या मालिकेला नुकतेच २० वर्षं पूर्ण झाली आहेत. या मालिकेत शालेय वयातील मुलांच्या आयुष्यातील समस्या, त्यांचे जगणं यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या मालिकेत निलंजना शर्मा, पॅमेला मुखर्जी, रशद राणा, शाहरुख बरुचा, पुरब कोहली, जाफर कराचीवाला, श्वेता साळवे, विशाल मल्होत्रा, किश्वर मर्चंट यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेतील अनेक कलाकारांनी आज छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर त्यांचे एक स्थान निर्माण केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या मालिकेत भूमिका चावला देखील होती. या मालिकेत तिने मीराची भूमिका साकारली होती. या मालिकेत केवळ एका भागासाठी ती दिसली होती. या मालिकेचे चित्रीकरण करत असतानाच तिला चित्रपटांच्या ऑफर्स येत असल्याने तिने ही मालिका सोडली असल्याचे म्हटले जाते. या मालिकेत तिची जागा प्रीती नारायण या अभिनेत्रीने घेतली होती.
 
२००० मध्ये युवाकुडू या तेलगू चित्रपटाद्वारे भूमिकाने तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती असेच सगळ्यांना वाटते. पण हे खरे नाहीये, भूमिका सगळ्यात पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली होती. भूमिका चावलाने तेरे नाम या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले होते. या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. हा चित्रपट आणि या चित्रपटातील सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तिने तेरे नाम या चित्रपटाआधी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. भूमिका चावला गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिने गेल्या वर्षी धोनी द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात ती धोनीच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती. तेरे नाम या चित्रपटामुळे भूमिकाला प्रेक्षकांनी भूमिका चावलाला डोक्यावर घेतले. पण त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये फारशी दिसली नाही. तिने त्यानंतर रन, दिल ने जिसे अपना कहा, सिलसिले, फॅमिली अशा काही चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिला यश मिळाले नाही. सध्या ती बॉलिवूडमध्ये दूर असून तिचा सगळा वेळ कुटुंबियांना देत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bhumika chawla was part of Hip Hip Hurray serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.