badhai ho part2 badhai do is comming soon rajkkumar rao will be in lead role | ‘बधाई हो’नंतर येतोय ‘बधाई दो’; आयुष्यमान नाही यावेळी राजकुमार झळकणार

‘बधाई हो’नंतर येतोय ‘बधाई दो’; आयुष्यमान नाही यावेळी राजकुमार झळकणार

ठळक मुद्दे‘बधाई हो’ या सिनेमाने  100 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला होता. आयुष्यमान व सान्या शिवाय नीना व गजराज राव यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाच्या ‘बधाई हो’ या फिल्मला आज 2 वर्ष पूर्ण झालीत आणि नेमक्या याच मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली. होय, खळखळून हसवणा-या  ‘बधाई हो’ या सिनेमाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिक्वेलचे  नाव ‘बधाई दो’ असे असणार आहे. 
‘बधाई हो’मध्ये तुम्ही आयुष्यमान खुराणा व  सान्या मल्होत्राची जोडी पाहिली होती. गजराज राव व नीना गुप्ता यांचीही एक जोडी होती. आता ‘बधाई हो’च्या सीक्वलमध्ये राजकुमार राव व भूमी पेडणेकरची जोडी जमणार आहे. येत्या जून महिन्यात या सिनेमाचे शूटींग सुरू होईल. हर्षवर्धन कुलकर्णी हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. याआधी 2015 मध्ये प्रदर्शित ‘हंटर’ हा सिनेमा हर्षवर्धनने दिग्दर्शित केला होता.

अशी असेल कथा
या सिनेमाची कथा अक्षत घिलडियाल व सुमन अधिकारीने लिहिली आहे. यात राजकुमार राव एका पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसार आहे तर भूमी एका पीटी टीचरच्या भूमिकेत. राजकुमार एका महिला पोलीस स्टेशनमध्ये काम करताना दिसणार आहे. महिला कर्मचा-यांमध्ये एकटा पुरूष अशी त्याची भूमिका आहे. या आधी राजकुमार राव 'तलाश' सिनेमामध्ये पोलिसच्या भूमिकेमध्ये दिसला होता.  ‘बधाई दो’ या सिनेमामध्ये काम करायला मिळणे म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच आहे. ही फिल्म माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षकांसाठी या सिनेमामध्ये एक सर्रप्राईझही आहे पण ते वेळ आल्यावरच आम्ही सांगू, सिनेमाच्या पहिल्या भागात प्रेक्षकांचे खूप मनोरंजन झाले. दुसºया भागातही आमचा तोच प्रयत्न असेल, असे राजकुमारने या सिनेमाबद्दल माहिती देताना सांगितले.

‘बधाई हो’ने केला होता 100 कोटींचा बिझनेस
‘बधाई हो’ या सिनेमाने  100 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला होता. आयुष्यमान व सान्या शिवाय नीना व गजराज राव यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. सिनेमातील अफलातून कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. वेगळ्या विषयाला वाहिलेल्या या सिनेमाला नॅशनल अवार्डने गौरविण्यात आले होते.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: badhai ho part2 badhai do is comming soon rajkkumar rao will be in lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.