ठळक मुद्देमी अजून लग्नाचा काहीही विचार केलेला नाहीये. मी पाच-सहा वर्षांनी लग्न करेन. पण मला कोणत्याही परदेशातील मुलासोबत लग्न करण्यापेक्षा भारतातील मुलासोबत लग्न करायला आवडेल.

अथियाने हिरो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर ती मुबारकाँ या चित्रपटात झळकली. आता ती मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटात एका आगळ्या वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...


मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटाची संकल्पना ऐकल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
खरं सांगू तर या चित्रपटाची संकल्पना ऐकल्यानंतर मी या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला होता. नवाझुद्दीन सिद्दीकीसारख्या अभिनेत्यासोबत काम कसे करायचे याचे मला टेन्शन आले होते. पण माझ्या वडिलांनी हे एका मला आव्हान म्हणून स्वीकारायला सांगितले आणि या चित्रपटात मी काम करण्याचे ठरवले. या चित्रपटात काम करताना मला अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली.

या चित्रपटासाठी तू खास बुंदेलखंडमधील भाषा शिकली आहेस, हे खरे आहे का?
मी या चित्रपटात भोपाळमध्ये राहाणाऱ्या एका मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी मला बुंदेलखंडची भाषा बोलणे गरजेचे होते. या भाषेचे उच्चार योग्य व्हावेत यासाठी मी ही भाषा शिकले.  

या चित्रपटात तुला एखाद्या परदेशातील मुलासोबत लग्न करायचे आहे... पण खऱ्या आयुष्यात अथियाला कोणत्या मुलासोबत लग्न करायचे?
मी अजून लग्नाचा काहीही विचार केलेला नाहीये. मी पाच-सहा वर्षांनी लग्न करेन. पण मला कोणत्याही परदेशातील मुलासोबत लग्न करण्यापेक्षा भारतातील मुलासोबत लग्न करायला आवडेल.

चित्रपटांच्या निवडीबाबत वडिलांकडून काही मागदर्शन घेतेस का?
तुम्ही स्टार कीड असल्याने तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळतो. पण इंडस्ट्रीत आल्यानंतर तुम्हाला तुमच्या अभिनय गुणांनी स्वतःला सिद्ध करायचे असते. मी सुनील शेट्टी यांची मुलगी असली तरी मला माझ्या मेहनतीवरच इंडस्ट्रीत माझे स्थान निर्माण करायचे आहे. कोणताही चित्रपट मला ऑफर झाल्यानंतर मी वडिलांशी याबाबत चर्चा करते. ते मला नक्कीच मार्गदर्शन करतात. पण निर्णय काय घ्यायचा हे सर्वस्वी मीच ठरवते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: athiya shetty wants to marry with indian boy reveals while promoting motichoor chaknachoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.