ठळक मुद्देत्यांचे लग्न अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआ यांच्यासोबत झाले असून राजोशी यांनी अनेक बंगाली मालिकांमध्ये काम केले आहे

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण त्यांच्याविषयी त्यांच्या फॅन्सना तितकीशी माहिती नाहीये. आशिष विद्यार्थी यांनी अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आज त्यांच्याविषयी काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

आशिष विद्यार्थी यांनी हिंदी, तामीळ, कन्नड, मल्याळम, तेलगू, बंगाली, इंग्रजी, ओडिसा आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते केवळ एक चांगले अभिनेते नव्हे तर खूपच चांगले मोटिव्हेशनल स्पीकर देखील आहेत. त्यांनी चित्रपटांप्रमाणे मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांना द्रोहकाल या त्यांच्या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात देखील आलेले आहे.

आशिष विद्यार्थी अनेक वर्षं बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाग असले तरी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे. ते मुलाखतींमध्ये देखील आपल्या कुटुंबियांविषयी न बोलणेच पसंत करतात. आशिष विद्यार्थी यांचे लग्न एका अभिनेत्रीसोबत झाले आहे. त्यांची पत्नी ही बंगाली इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांचे लग्न अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआ यांच्यासोबत झाले असून राजोशी यांनी अनेक बंगाली मालिकांमध्ये काम केले आहे. सुहानी सी एक लडकी या हिंदी मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्या दोघांना एक मुलगा असून त्यांच्या मुलाचे नाव अर्थ आहे.

आशिष विद्यार्थी यांचा जन्म हा केरळमधील असून त्यांच्या आई या प्रसिद्ध कथ्थक नर्तिका होत्या. त्यांनी कॉलेज जीवनात असताना रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. तसेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले. त्यांनी सरदार या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी सरदार या चित्रपटाचे चित्रीकरण आधी केले असले तरी त्यांचा द्रोहकाल हा चित्रपट आधी प्रदर्शित झाला.

द्रोहकाल या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या असून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद त्यांच्या भूमिकांना मिळालेला आहे. इस रात की सुबह नही, १९४२ अ लव्ह स्टोरी, जीत, जिद्दी या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. त्यांनी अल्ट बालाजीच्या मिशन ओव्हर मार्स या वेबसिरिजमध्ये देखील काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ashish Vidyarthi's wife is actress Rajoshi Vidyarthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.