ठळक मुद्देविराट आणि अनुष्का यांच्या चेहऱ्याचे वाचन करून त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली लवकरच आईबाबा बनणार आहेत. त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही गुड न्यूज त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. अनुष्का शर्मा या महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी विराट क्रिकेट मालिका सोडून भारतात परतला आहे. आता त्यांना मुलगा होणार की मुलगी अशी उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांना मुलगा होणार की मुलगी याची भविष्यवाणी एका ज्योतिषाने केली आहे.

‘इंडिया. कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रसिद्ध ज्योतिष पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी विरुष्काला मुलगा होणार की मुलगी हे सांगितलं आहे. पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, अनुष्का आणि विराटला एक गोंडस मुलगी होणार आहे. या चिमुकलीमुळे त्यांचे जीवन पूर्ण बदलणार आहे. त्यांच्या मुलीच्या आगमनाने आयुष्यात प्रचंड आनंद निर्माण होणार आहे. ही मुलगी तिच्या वडिलांसाठी भाग्यवान असेल असे देखील त्यांनी सांगितले आहे. विराट आणि अनुष्का यांच्या चेहऱ्याचे वाचन करून त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता. या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले.

काही दिवसांपूर्वी पापाराझींनी अनुष्काचे विराटसोबतचे काही खाजगी फोटो क्लिक केले होते आणि हे पाहून अनुष्का भडकली होती. तिने सोशल मीडियावर याबद्दलची नाराजी व्यक्त करत, पापाराझींचा चांगलाच क्लास घेतला होता. विराट आणि अनुष्का घराच्या लॉबीत एकमेकांसोबत क्वॉलिट टाईम स्पेंड करत असताना पाहून काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक केले होते. हेच फोटो नंतर व्हायरल झाले होते. नेमक्या याच कारणाने अनुष्काचा पारा चढला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anushka Sharma-Virat Kohli to be Blessed With a Baby Girl, Says Astrology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.