Amrita Singh did something that you would be passionate to hear !! | अमृता सिंहने केले असे काही की, ऐकून तुम्हीही व्हाल भावुक!!
अमृता सिंहने केले असे काही की, ऐकून तुम्हीही व्हाल भावुक!!

आईचं प्रेम ते आईचंचच प्रेम...त्याला कशाचीच सर येऊ शकत नाही. मग ती सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी... होय हे अगदी खरंय.. कारण, नुकतीच अभिनेत्री अमृता सिंगने तिची मुलगी सारा अली खानबद्दल असे काही केले की, ऐकून तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाही. सारा अली खानचे फोटोशूट सुरू असताना अमृता सिंगने साराला काजळ लावून ती म्हणाली,‘माझ्या बाळाला कुणाचीही नजर लागू नये.’ आहे की, भावुक करणारी घटना?

भारतात खासकरून आई तिच्या मुलीला काजळाचा काळा टीका लावल्याशिवाय बाहेर जाऊ देत नाही. पण हा प्रकार फक्त सर्वसामान्यांच्या घरातच नाही तर बॉलिवूड सेलिब्रेटींच्या कुटुंबातही घडतो. सारा अली खानचे असे फोटो पाहिल्यावर तुम्हालाही विश्वास बसेल की बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा या काळ्या टीक्यावर खूप विश्वास ठेवतात. सारा अली खाननं काही दिवसांपूर्वीच भाऊ इब्राहिमसोबत एका मासिकासाठी फोटोशूट केलं. यावेळचे तिचे काही अनसीन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात साराची आई अमृता सिंह लेकीला दृष्ट लागू नये म्हणून साराच्या कानामागे काळा टीका लावताना दिसत आहे. तर दुसरीकडे इब्राहिम फनी फेस बनवताना दिसत आहे. साराचे हे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मुलं आहेत. अमृतासोबत घटस्फोट घेतल्यानंतर सैफनं अभिनेत्री करिना कपूरशी लग्न केलं. या दोघांना तैमुर नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. तर सारा आणि इब्राहिम पहिल्यांदाच एका मासिकाच्या कव्हर पेजवर एकत्र दिसणार आहे. सारानं मागच्याच वर्षी 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पादर्पण केलं होतं. त्यानंतर ती सिंबामध्ये दिसली. सध्या तिच्याकडे 'लव्ह आज कल 2' आणि 'कुली नंबर 1'  असे 2 सिनेमा आहेत.

Web Title: Amrita Singh did something that you would be passionate to hear !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.