Ajay-Kajol gets emotional for 'Daughters Day'; Shared photo of the trust! | ‘डॉटर्स डे’ निमित्त भावुक झाले अजय-काजोल; शेअर केला न्यासाचा फोटो!

‘डॉटर्स डे’ निमित्त भावुक झाले अजय-काजोल; शेअर केला न्यासाचा फोटो!

सामान्यांप्रमाणेच बॉलिवूडकरांनी पण आज ‘डॉटर्स डे’ सेलिब्रेट केला. बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी आपापल्या मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि सेनोरिटा काजोल देवगण यांनी देखील ‘डॉटर्स डे’ निमित्त त्यांची मुलगी न्यासा हिचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी ते भावुक झाले. 

काजोलने इंस्टाग्रामवर न्यासासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती काजोलला मिठी मारताना दिसत आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे, तू माझ्या कुशीत कायम आनंदी राहशील.’ हे लिहिताना काजोल भावूक झाल्याचे जाणवते. 

काजोलसोबतच अजय देवगण यानेही एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात अजयसोबत न्यासा आणि युग हे त्याचे दोन्ही मुले दिसत आहेत. ते तिघे स्वीमिंग करताना दिसत आहेत. त्याने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, ‘आपल्याला दरदिवशी डॉटर्स डे सेलिब्रेट करायला हवा.’

अजय देवगण आणि काजोल यांच्या लग्नाच्या चार वर्षांनंतर २० एप्रिल २००३ रोजी न्यासाचा जन्म झाला. युगचा जन्म १३ सप्टेंबर २०१३ रोजी झाला. अजय आणि काजोल हे त्यांच्या मुलांना मीडियापासून लांबच ठेवतात.      

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ajay-Kajol gets emotional for 'Daughters Day'; Shared photo of the trust!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.