Ajay Devgan's younger brother Anil Devgan passed away | बॉलिवूडला आणखी एक झटका, अजय देवगणचा छोटा भाऊ अनिल देवगणचे निधन

बॉलिवूडला आणखी एक झटका, अजय देवगणचा छोटा भाऊ अनिल देवगणचे निधन

2020 वर्षे बॉलिवूडसाठी खूप वाईट ठरलं आहे. एकानंतर एक वाईट वृत्त समोर येत आहेत. आता अजय देवगणवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा छोटा भाऊ अनिल देवगणचे निधन झाले आहे. अनिल देवगणचे वय 45 वर्षे होते. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अद्याप त्याच्या निधनाचे कारण समोर आलेले नाही.


अजय देवगणने स्वतः सोशल मीडियावर ही वाईट बातमी शेअर केले आहे. सोमवारी (ता.5) रात्री अनिल देवगणने जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजय देवगणने लिहिले की, अजय देवगण फिल्म्स आणि त्याची कमतरता जाणवेल. त्याच्या आत्म्यास शांती मिळावी, त्यासाठी प्रार्थना करा. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे शोकसभा आयोजित केली नाही.


अनिल देवगणने 1996 साली सनी देओल, सलमान खान आणि करिश्मा कपूरची मुख्य भूमिका असलेला चित्रपट जीतमधून सहायक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्याने जान, प्यार तो होना ही था, इतिहास आणि हिंदुस्तान की कसम चित्रपटात सहायक म्हणून काम केले होते.
2000 साली अजय देवगणचा चित्रपट राजू चाचामधून अनिलने दिग्दर्शक म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली. या चित्रपटात काजोल, ऋषी कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. राजू चाचा अजय देवगणच्या होम प्रोडक्शनचा पहिला चित्रपट होता. 2005 साली अनिलने ब्लॅकमेल चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्याने 2008 साली चित्रपट हाले दिलचे दिग्दर्शन केले. अजय देवगणच्या सन ऑफ सरदार चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर होता. मागील वर्षी 27 मे रोजी अजय देवगणचे वडील वीरू देवगणचे निधन झाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ajay Devgan's younger brother Anil Devgan passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.