ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. या दोघांच्या नात्याला १३ वर्षे झाले आहेत, पण त्यांच्यातील प्रेम आजही कायम आहे. दोघे बऱ्याचदा एकत्र स्पॉट होतात मग तो कोणता इव्हेंट असो किंवा फंक्शन. नेहमी सर्व कपल लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आठवणींना मनाच्या कोपऱ्यात कायम स्वरूपी जपून ठेवतात. अशात सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नांच्या वाढदिवसाचा एक किस्सा व्हायरल होतो आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत अभिषेक आणि ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यात आला की त्यांनी आजवर एकमेकांसाठी काय रोमँटिक गोष्ट केली आहे. हा प्रश्न ऐकताच सर्वात आधी ते दोघेही हसू लागले. पण पुढच्याच क्षणाला अभिषेकने सांगितले की लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसा दिनानिमित्त त्याने समुद्र किनाऱ्यावर कँडल लाईट डिनर प्लान केला होता. मात्र हीच गोष्ट त्या दिवशी ऐश्वर्याला अजिबात आवडली नाही. 

ऐश्वर्याच्या मते समुद्र किनाऱ्यावर कँडल लाईट डिनर करणे ही अतिशय वाईट गोष्ट आहे. कारण हवेमुळे एकत्र मेणबत्त्या जास्त वेळ राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाळू उडून आपल्या जेवणात पडते. याच कारणामुळे त्यांचा तो स्पेशल दिवस खराब झाला. 


ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवसाच्या रोमँटिक डेटला कधीच विसरू शकत नाही. कारण ऐश्वर्याचा मूड ऑफ झाला होता आणि अभिषेकवर ती प्रचंड वैतागली होती. 

२००० साली पहिल्यांदा अभिषेक आणि ऐश्वर्याने ढाई अक्षर प्रेम के चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर तीन वर्षानंतर म्हणजेच २००३ साली त्या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट होता कुछ ना कहो. त्यावेळी ते दोघे फक्त फ्रेंड होते.

२००५ साली पुन्हा एकदा त्यांनी बंटी और बबली सिनेमात काम केले. या चित्रपटातील कजरारे या गाण्यात फक्त ऐश्वर्याने काम केले होते. पण या गाण्याच्या शूटिंगदरम्यान ते दोघे एकमेकांना लाइक करू लागले. त्यानंतर दोघांनी उमराव जान, गुरू आणि धूम २मध्ये एकत्र काम केले. चित्रपटादरम्यान त्या दोघांना बराच वेळ मिळाला आणि त्या दोघांमध्ये प्रेम झाले. ते दोघे २० एप्रिल, २००७ साली लग्नबेडीत अडकले. आता त्यांच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aishwarya Rai was very angry with Abhishek Bachchan on her second wedding anniversary, this is the reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.