बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी यशराज फिल्म्सच्या बंटी और बबली २ चित्रपटानंतर आणखी एका चित्रपटासाठी साइन केले आहे. यासोबतच शर्वरीने यशराज फिल्म्ससोबत तीन चित्रपट साइन केले आहेत. या प्रोजेक्ट्सची लवकरच घोषणा करणार आहे.

बंटी और बबली २ चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्राने या चित्रपटाचे शूटिंग पाहिल्यानंतर त्याला शर्वरीचे काम खूप आवडले. आदित्यने या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच शर्वरीला आणखी एका चित्रपटाची ऑफर दिली आहे.सूत्रांकडून समजते आहे की हा चित्रपट बिग बजेटच्या मोठ्या कलाकारांसोबत बनणार आहे.


शर्वरीला तिच्या तिसऱ्या चित्रपटाबद्दल सांगण्यात आले आहे आणि असं समजते आहे की हा एक मेगा बजेट चित्रपट असणार आहे. यशराजच्या सूत्रांनी शर्वरीसोबत आदित्य चोप्राने यशराज फिल्म्सच्या प्रसिद्ध तीन चित्रपटांची डील केली आहे. बंटी और बबली २चे पोस्ट प्रोडक्शनचे काम संपल्यानंतर याची रिलीज डेट ठरविण्यात येईल. या चित्रपटाच्या रिलीजच्या आधीच शर्वरी दुसऱ्या चित्रपटांच्या शूटिंगला सुरूवात करेल. शर्वरीच्या कामाच्या चर्चा जसजशा यशराज फिल्म्स स्टुडिओच्या बाहेर येत आहे तसतसे लोकांना तिला चित्रपटात काम करताना पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. 


बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नसताना यशराज फिल्मच्या टॅलेंट टीमने शर्वरीला शोधले आहे. यशराज फिल्म्सच्या चित्रपटातून शर्वरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. कॅमेरासमोर येण्यापूर्वी शर्वरीवर आदित्य चोप्राने खूप मेहनत घेतली. दोन वर्षे तिला ट्रेनिंग दिले आहे.

 सूत्रांनी सांगितले की, शर्वरीमध्ये उत्तम लूकसोबत अभिनय कौशल्यदेखील आहे. त्यामुळेच तिला यशराज फिल्म्सच्या तीन चित्रपटासाठी साईन करण्यात आले आहे. तसेच ती कबीर खान दिग्दर्शित द फॉरगॉटेन आर्मी या वेबसीरिजमध्येही झळकली होती. यातील तिच्या कामाचे खूप प्रशंसाही झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After 'Bunty Aur Babli 2', Sherwari started winning big lottery, Yashraj Films got three projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.