Admirable! Aamir Khan's 'Pani Foundation' grows forests on barren land; Shared video | कौतुकास्पद! आमिर खानच्या 'पानी फाउंडेशन'ने नापीक जमिनीवर उगवले जंगल; शेअर केला व्हिडीओ

कौतुकास्पद! आमिर खानच्या 'पानी फाउंडेशन'ने नापीक जमिनीवर उगवले जंगल; शेअर केला व्हिडीओ

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानने आपल्या 'पानी फाउंडेशन'च्या माध्यमातून पाण्याच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावला आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाउंडेशन प्रयत्न करत आहे. हे फाउंडेशन महाराष्ट्रातील गावांमध्ये जल संरक्षण आणि वाटरशेड बांधण्याच्या दिशेने कार्य करते. सप्टेंबर २०१८ पासून सुरू झालेल्या 2 वर्षांच्या कालावधीत, महान जपानी पारिस्थितिकीविद अकीरा मियावाकी यांच्यापासून प्रेरित- सायट्रीस पर्यावरण ट्रस्टसोबत एकत्र येऊन 'पानी फाउंडेशन'ने आपल्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रवासाची सुरुवात केली, ज्यामध्ये एका पडीक जमिनीचे जंगलात रूपांतर केले. दोन वर्षानंतर, सप्टेंबर २०२० मध्ये या परियोजनेला यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.

पानी फाउंडेशनने सातारा जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील गावकऱ्यांच्या मदतीने २००० झाडे लावली. एक जंगल बनवण्यासाठी झाडांच्या विविध प्रजातींना जाणीव पूर्वक एकत्र लावण्यात आले आणि वृक्षारोपणावर सविस्तर लक्ष ठेवण्यात आले जेणेकरून ते वेगात वाढतील. शेवटचा परिणाम जबरदस्त आणि अभिमानास्पद आहे. निरोगी झाडांसोबत या घनदाट जंगलात, पशुपक्ष्यांसाठी निवास स्थान, फुलपाखरे, कीटक आणि बरेच काही आहे. 

View this post on Instagram

Please watch and give me your reactions. Love. a.

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on


आमिरने हा मनाला स्पर्शून जाणारा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, टीमने केलेल्या वेगळ्या प्रयोगासाठी खूप अभिमानास्पद वाटत आहे. 

आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पानी फाउंडेशनची टीम मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि आसपास जल संरक्षण गतिविधिच्या कार्याशी सलग्न आहे. फाउंडेशनच्या अविश्वसनीय कार्याने, वेळ आणि प्रयत्नाने मनुष्य, वृक्ष आणि पशुपक्ष्यांना सामंजस्यपूर्ण रुपात   सक्षम बनवले असून त्यांच्या प्रयत्नाने या पडीक, दुष्काळी जमिनीवर आज हरित जंगले उभी राहताना दिसत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Admirable! Aamir Khan's 'Pani Foundation' grows forests on barren land; Shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.