Aditya Roy Kapoor to appear in action role for the first time; Increased weight for the role! | प्रथमच अ‍ॅक्शन भूमिकेत दिसणार आदित्य रॉय कपूर; भूमिकेसाठी वाढवले वजन!

प्रथमच अ‍ॅक्शन भूमिकेत दिसणार आदित्य रॉय कपूर; भूमिकेसाठी वाढवले वजन!

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर हा आगामी ‘मलंग’ चित्रपटात वेगळयाच अंदाजात दिसणार आहे. मोहित सुरी यांच्या दिग्दर्शनाखालील चित्रपटासाठी त्याने तब्बल १० किलो वजन वाढवल्याचे समजतेय. आदित्यने  ‘फितूर’ चित्रपटातही वजन वाढवले होते. मात्र अशातच प्रदर्शित झालेला ‘कलंक’ चित्रपटासाठी त्याला पुन्हा वजन कमी करावे लागले. आता मात्र आदित्य अ‍ॅक्शन रोलमध्ये दिसणार आहे. ‘मलंग’ हा एक रोमँटिक हॉरर चित्रपट आहे ज्यात आदित्य रॉय कपूरसोबत दिशा पटानी, अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे कलाकार दिसतील.         

या चित्रपटाबद्दल बोलताना आदित्य म्हणाला,‘मलंग एक डार्क थ्रिलरपट असून हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. मी या चित्रपटाबाबत खूपच उत्साही आहे. मी प्रथमच अ‍ॅक्शन रोल करणार असून त्यासाठी मी अधिक मेहनत देखील घेत आहे. मला या भूमिकेसाठी दहा किलो वजन वाढवावे लागले. पण, त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वात  बदल होणार आहे. तो बदल मला एक कलाकार म्हणून स्विकारायचा आहे.’ 
             आदित्य रॉय कपूर यापूर्वी ‘कलंक’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर  फार काही कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटात  आलिया भट्ट, वरूण धवन, संजय दत्त, माधुरी दिक्षीत अशी तगडी स्टारकास्टची मंडळी होती. तरीही चित्रपट गल्ला जमवू शकला नाही. 

Web Title: Aditya Roy Kapoor to appear in action role for the first time; Increased weight for the role!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.