Actor Aftab Shivdasani to appear in the police officer's role! | अभिनेता आफताब शिवदासानी दिसणार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत !

अभिनेता आफताब शिवदासानी दिसणार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत !

आश्विनी चौधरी दिग्दर्शित ‘सेटर्स’ या चित्रपटात अभिनेता आफताब शिवदासानी आयपीएस ऑफिसरच्या  भूमिकेत दिसणार आहे. पोलिसांच्या भूमिकेला अधिक जवळून अभ्यासण्यासाठी आफताबने आयपीएस ऑफिसरच्या  क्वॉर्टर्समध्ये काही दिवस वास्तव्य केले आहे. पोलिसांचे दैनंदिन ड्रील्स, त्यांच्या केसेस, त्यांची आव्हाने यांचा त्याने तिथे राहून अभ्यास केला आहे. 

आफताब शिवदासानी म्हणतो,‘मी प्रत्येक भूमिका परफेक्ट करण्यासाठी मेहनत घेतो. मला खऱ्याखुऱ्या पोलिसांच्या मिशनवर जाण्याची संधी मिळाली. ते कशाप्रकारे त्यांच्या आयुष्यातील या आव्हानांचा सामना करतात हे मी जवळून अनुभवले आहे.’ श्रेयस तळपदे याने निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे. 


आफताबने शेअर केलेल्या फोटोत आफताबने पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहे. हा फोटो त्याच्या नव्या सिनेमातील आहे. या चित्रपटाचे नाव 'सेटर्स' असून या चित्रपटात तो पोलीस अधिकारी आदित्य सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी आफताबने दाढी ठेवली आहे. इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करत लिहिले की, 'एकटेपणात एक शक्ती आहे. या शक्तीला फार कमी लोक सांभाळू शकतात.'


'सेटर्स' चित्रपटाची कथा शिक्षण जगतातील माफियांवर आधारीत आहे. यात आफताब माफियांविरोधात लढताना दिसणार आहे.सेटर्समध्ये आफताबचा वेगळा अंदाज रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट ३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आफताबला पोलिसाच्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. लव्हली फिल्म्स प्रोडक्शन आणि एनएच स्टुडिओज निर्मित ‘सेटर्स’ चित्रपटात श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, सोनाली सेहगल, इशिता दत्ता, पवन मल्होत्रा, विजय राज, जमील खान, मनू रिशी, पंकज झा, नीरज सूद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. सलीम सुलेमान यांचे चित्रपटाला संगीत लाभलेले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  Actor Aftab Shivdasani to appear in the police officer's role!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.