Aamir Khan's son Junaid ready to debut in bollywood | आमिर खानचा मुलगा जुनैद बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज, पुन्हा नेपोटीझचा मुद्दा पेटणार?

आमिर खानचा मुलगा जुनैद बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज, पुन्हा नेपोटीझचा मुद्दा पेटणार?

सुपरस्टार आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाला आहे. त्याला आपल्या सिनेमासाठी कोणतीच कसर सोडायची नाही आहे. गेल्या 3 वर्षांपासून तो स्वत:ला सिनेमांसाठी तयार करतो आहे. जुनैद लॉस एंजिल्समधील अकादमीत ट्रेनिंग घेतो आहे. 

 

टीव्ही 9च्या रिपोर्टनुसार जुनैद मल्याळम सिनेमा इश्कच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. हा एक रोमाँटिक, थ्रीलर सिनेमा आहे. अनुराग मनोहर या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. थिएटर आर्टिस्ट असण्यासोबतच जुनेद अनेक बॉलिवूड सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार आमिर खान जुनैदबद्दल बोलताना म्हणाला होता की, जुनैद गेल्या 3 वर्षांपासून थिएटर करतो आहे आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतो आहे. जुनैद हा आमिरच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. दुसरीकडे, हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे की आता जुनैद जेव्हा बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार तेव्हा पुन्हा एकदा नेपोटीझम चर्चेला उधाण येईल का?

आमिर खान लवकरच लाल सिंग चड्ढामध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत करिना कपूर स्क्रिन शेअर करणार आहे.  'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aamir Khan's son Junaid ready to debut in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.