7 months after Rishi Kapoor's death, Neetu started shooting, emotional memories of her husband | ऋषी कपूर यांच्या निधनाच्या ७ महिन्यानंतर नीतू यांनी सुरू केले शूटिंग, पतीच्या आठवणीत झाल्या इमोशनल

ऋषी कपूर यांच्या निधनाच्या ७ महिन्यानंतर नीतू यांनी सुरू केले शूटिंग, पतीच्या आठवणीत झाल्या इमोशनल

अभिनेत्री नीतू कपूर पती अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाच्या ७ महिन्यानंतर कामावर रुजू झाल्या आहेत. त्या आगामी चित्रपट जुग जुग जियोच्या शूटिंगसाठी रवाना झाल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. या फोटोत अनिल कपूर, वरूण धवन, कियारा आडवाणी आणि प्राजक्ता कोहलीदेखील नीतू यांच्यासोबत एका प्रायव्हेट जेटच्या बाहेर उभे दिसत आहेत.


नीतू कपूर यांनी फोटो शेअर करत दोन्ही मुले रणबीर कपूर आणि रिद्धीमा कपूर साहनी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, या भीतीदायक परिस्थितीत माझी पहिली फ्लाइट. या प्रवासात नर्व्हस होत आहे. कपूर साहेब, तुम्ही माझा हात पकडला नसलात तरी तुम्ही माझ्यासोबत आहात. #RnR (रणबीर-रिद्धिमा). खूप जगा. काम करण्यासाठी मला प्रोत्साहन दिले त्याबद्दल धन्यवाद.


नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोत कोणत्याच कलाकाराने मास्क घातलेला नाही. याचे कारण सांगत नीतू कपूर यांनी लिहिले की, आम्ही सर्वांनी कोरोनाची टेस्ट केली आहे आणि सुरक्षित आहे. त्यामुळे फोटो क्लिक करताना सर्वांनी मास्क काढला आहे. नीतू यांना नव्या सुरूवातीसाठी बॉलिवूड सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक बच्चनने लिहिले की, ऑल द बेस्ट. गुड लक. सोनाली बेंद्रेने लिहिले की, ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप सारे प्रेम.


३० एप्रिल, २०२० ला ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मागील दोन वर्षांपासून अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ते भारतात परतले होते. त्यानंतर मार्चमध्ये त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे निधन झाले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 7 months after Rishi Kapoor's death, Neetu started shooting, emotional memories of her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.