13 years of jab we met kareena kapoor celebrates occasion with picture featuring shahid kapoor and imtiaz ali | करिनाने शाहिद कपूरसोबतचा शेअर केला फोटो , म्हणाली- रियल में इसांन जो चाहता है...

करिनाने शाहिद कपूरसोबतचा शेअर केला फोटो , म्हणाली- रियल में इसांन जो चाहता है...

करीना कपूर आणि शाहिद कपूरचा रोमँटिक सिनेमा 'जब वी मेट' हा बॉलिवूडमधील हिट चित्रपटांपैकी एक आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा सिनेमा 26 ऑक्टोबर 2007 ला रिलीज झाला होता. करिना कपूरने या निमित्ताने सिनेमातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


करीना कपूरने लिहिले हे कॅप्शन 
करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोमवारी जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तिने 'जब वी मेट' सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत करिना सोबत तिचा को-स्टार शाहिद कपूर आणि दिग्दर्शक इम्तियाज अलीसुद्धा दिसतोय. हा फोटो शेअर करताना करिनाने लिहिले, ''आयुष्यात माणसाला जे काही खरोखरच हवं असतं ते त्याला प्रत्यक्षात मिळतं.''  

करिना आणि शाहिदची होती मुख्य भूमिका 
'जब वी मेट' सिनेमात करिनाने गीत नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. जी खूप बोलकी आणि चुलबुली असते. तर शाहिद कपूरने एका बिझनेस घराण्यातील मुलाची भूमिका साकारली होती. 


करीना आणि शाहिदचे आगामी सिनेमा
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर करिना कपूर 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे. तर शाहिद कपूर 'जर्सी' सिनेमात, काही दिवसांपूर्वीच तो या सिनेमाचे उत्तराखंडमध्ये जाऊन शूटिंग करुन आला आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 13 years of jab we met kareena kapoor celebrates occasion with picture featuring shahid kapoor and imtiaz ali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.