युथ मतदान केंद्रावर तरुणाईचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 17:42 IST2024-04-19T17:39:56+5:302024-04-19T17:42:03+5:30
Lok Sabha Election 2024: ‘१०० टक्के मतदान करू’, ‘लोकशाही माझा अभिमान’ अशे नारे देत युथ मतदान केंद्रावर तरुणाईचा उत्साह

Bhandara youth polling booth
भंडारा : मतदानासाठी स्थापन करण्यात आलेल्या युथ मतदान केंद्रावर तरुणांचा प्रचंड उत्साह पाहावयास मिळाला. तालुक्यातील बेला येथे युथ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले. या केंद्रावर सकाळपासून अनेक युवकांसह मतदारांनीही उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बेला येथील १७४ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सजावट केल्याचे दिसून आले. फुगे, मंडप डेकोरेशन, सेल्फी पॉईंटसह आरोग्याच्या दृष्टीने ओआरएस, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ‘१०० टक्के मतदान करू’, ‘लोकशाही माझा अभिमान’ असे आवाहन करणारे फलक लावले होते.
या १७४ बुथ क्रमांकावर मतदारांची संख्या १४६१ एवढी आहे. या केंद्रात एक निवडणूक अधिकारी व त्यांचे चार सहकारी, एक होमगार्ड, एक पोलिस कर्मचारी कार्यरत होते. मतदान केल्यानंतर अनेकजण सेल्फी काढून ती आपल्या मित्रमंडळींना पाठविताना युवक दिसून आले. भर उन्हातही मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.