Lok Sabha Election 2019; स्थिर संरक्षण पथकाकडून विशेष वाहन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:59 AM2019-04-11T00:59:08+5:302019-04-11T01:00:13+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली असून अनेक ठिकाणी चेकपोस्ट, तसेच स्थिर संरक्षण पथके नेमण्यात आली आहेत. त्याअंतर्गत जिल्हा सीमेवरील खरबी (नाका) येथे वाहणाची कसून चौकशी, तसेच संशयीत वाहनांची विशेष तपासणी करण्यात येत आहे.

Lok Sabha Election 2019; Special vehicle inspection by a stable protection squad | Lok Sabha Election 2019; स्थिर संरक्षण पथकाकडून विशेष वाहन तपासणी

Lok Sabha Election 2019; स्थिर संरक्षण पथकाकडून विशेष वाहन तपासणी

Next
ठळक मुद्देसंशयीतांची कसून चौकशी : तपासणीचे व्हिडीओ चित्रीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली असून अनेक ठिकाणी चेकपोस्ट, तसेच स्थिर संरक्षण पथके नेमण्यात आली आहेत. त्याअंतर्गत जिल्हा सीमेवरील खरबी (नाका) येथे वाहणाची कसून चौकशी, तसेच संशयीत वाहनांची विशेष तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता जाहिर झाल्यापासून जिल्ह्याच्या प्रवेश सीमांवर जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली असल्याची माहिती ठाणेदार सुभाष बारसे यांनी दिली. अवजड वाहनांसह, दुचाकीचालकांची या मार्गावरुन वाहतूक सुरु असते.
नागपूर आणि भंडारा जिल्ह्याची हदद म्हणून खरबी (नाका) हे गाव सीमेवर असल्याने येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने व पोलीस प्रशासनाकडून स्थिर संरक्षण पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.
यामध्ये तलाठी हरिदास खोंडे यांच्या मार्गदर्शनात एएसआय सुदाम कांबळे, ग्रामसेवक शेख, कॅमेरामन प्रज्वल शेंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी माहिती देताना खोंडे यांनी सांगितले की, संशयीत वाहनांची विशेष चौकशी करत असल्याने अद्यापतरी कोणताही अनुचीत प्रकार आढळून आला नसल्याची माहिती दिली. आतापर्यंत किमान ५०० पेक्षा जास्त वाहनांची तपासणी झाल्यांचे त्यांनी सांगितले.
जिल्हा सीमेवरील खरबी नाका येथे तपासणी
भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जवाहर पोलीस ठाण्याअंतर्गत खरबी (नाका) येथे ‘स्थिर संरक्षण पथकाकडून’ खरबी नाका येथे राष्ट्रीय महामार्गावर व्हिडीओ कॅमेराच्या निगराणीखाली तपासणी होत असल्याची माहिती ठाणेदार सुभाष बोरसे यांनी दिली. तसेच प्रत्येक वाहनांची नोंद ठेवत स्थिर पथकाची सतत अपडेट घेतली जाते. दोन जिल्ह्याच्या प्रवेशावरील राष्ट्रीय महामार्गावरुन मोठी वाहतुक होत असल्याने याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील खरबीचा पहिलाच स्थिर संरक्षण पथक असल्याने पथकातील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे.
-हरीदास खोंडे, तलाठी खरबी पथक प्रमुख
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रचारसभेसाठी येणाऱ्या नेतेमंडळीचे जिल्ह्यात येणे जाणे याच मार्गावरुन असल्याने, या जिल्हा हद्दीतील चेकपोस्टवर विशेष भर देवून व्हिडीओ कॅमरोच्या निगराणीखाली वाहनांची तपासणी सुरु आहे.
-सुभाष बोरसे, ठाणेदार जवाहरनगर पोलीस ठाणे

Web Title: Lok Sabha Election 2019; Special vehicle inspection by a stable protection squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.