अंबाजोगाई-परळी घाटात भीषण अपघात, तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 15:28 IST2023-02-12T14:24:21+5:302023-02-12T15:28:33+5:30

काल सायंकाळी मोटरसायकल व उसाची ट्रॉली यांच्यात भीषण अपघात झाला.

Parli-Mbajogai news; Terrible accident in Ambajogai-Parli ghat, three friends died | अंबाजोगाई-परळी घाटात भीषण अपघात, तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

अंबाजोगाई-परळी घाटात भीषण अपघात, तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

परळी: परळी-अंबाजोगाई घाटात काल सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात परळी शहरातील व्यंकटेश कांदे, शुभम धोकटे आणि रोहित भराडिया या तीन मित्र्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे तिघे लातूरवरुन एक लग्न समारंभातून परळीकडे येत होते. यावेळी अंबेजोगाई ते परळी मार्गावर एका उसाच्या ट्रॉलीला यांची दुचाकी धडकली.

सविस्तर माहिती अशी की, अंबाजोगाई-परळी रस्त्यावर घाटामध्ये सायंकाळी 6.45 वा.सुमारास मोटरसायकल व उसाची ट्रॉली यांचा भीषण आपघात घडला. माहिती मिळाल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून आपघातग्रस्तांना उपचारासाठी हलवण्यात मदतकार्य केले. या आपघात व्यंकटेश कांदे(रा. बँक कॉलनी, परळी), रोहित भराडीया(रा. इंडस्ट्रियल एरिया, परळी) आणि शुभम धोकटे(रा. पद्मावती गल्ली, परळी) गंभीर जखमी झाले.

या तिघांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना यातील दोन युवकांची प्राणज्योत मालवल्याची प्राथमिक माहीती पोलिसांनी दिली. तसेच, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तीन मित्रांचा असा अचानक अंत झाल्यामुळे परळीत हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Parli-Mbajogai news; Terrible accident in Ambajogai-Parli ghat, three friends died