बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 19:03 IST2024-04-28T19:02:42+5:302024-04-28T19:03:09+5:30
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी उपोषण करून आरक्षण मिळत नसते, असे विधान केले होते.

बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
सोमनाथ खताळ, बीड : गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाचा समारोप रविवारी झाला. यावेळी बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एकाच व्यासपीठावर आले. दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी उपोषण करून आरक्षण मिळत नसते, असे विधान केले होते. त्यावर जरांगे यांनी माझ्या नादी लागू नका, असा इशारा दिला होता. त्यावर पंकजा यांनी याचा खुलासाही केला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच रविवारी दुपारी हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले.
पंकजा व्यासपीठावर गेल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ही गर्दी खाली उतरण्यासाठी पोलिसांनीही धाव घेतली होती. साधारण १० मिनिटे हे दोघेही एकाच व्यासपीठावर होते. गर्दीमुळे त्यांच्यात फारसे काही बोलणेही झाले नाही. विशेष म्हणजे, याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे हेदेखील उपस्थित होते.