बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त; ड्रोनद्वारे राहणार नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:20 IST2019-05-23T00:19:28+5:302019-05-23T00:20:27+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने तगडा बंदोबस्त लावला आहे.

बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त; ड्रोनद्वारे राहणार नजर
सोमनाथ खताळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने तगडा बंदोबस्त लावला आहे. सीआरपीएफ, आरसीपीसारख्या विशेष तुकड्या प्रत्येक ठिकाणी तैनात केल्या आहेत. तसेच या परिसरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे उपद्रवींवर नजर ठेवली जाणार आहे.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अजित बोºहाडे यांनी सोमवारीच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. त्यानंतर मंगळवारी दुपारी बंदोबस्ताची तालीम करण्यात आली. यावेळी नियूक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना जी.श्रीधर यांनी सूचना केल्या.
तसेच अचानक काही परिस्थिती उद्भवली तर घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.
दरम्यान, हा बंदोबस्त चार टप्प्यात असणार आहे. तीन टप्प्यांपर्यंत केवळ माध्यम प्रतिनिधीला मोबाईलसाठी परवानगी असेल. चौथ्या टप्यात विशेष बंदोबस्त असेल. तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आणि उमेदवारांच्या घराजवळही पोलीस बंदोबस्त असणार आहे. केंद्र परिसरात विजय कबाडे तर बाहेर अजित बोºहाडे बंदोबस्त पाहतील.
दरम्यान, गोंधळ घालणाºया कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतले जाणार आहे. कोणी खोट्या अफवा पसरवल्या तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
बीड शहरासह गावागावांत बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांचे फिक्स पॉईंट राहणार आहेत. १६० संवेदनशिल गावांमध्ये पोलीस लक्ष ठेवून राहणार आहेत. तसेच साध्या कपड्यातील पोलीसही गोपनीय माहिती घेणार असल्याचे अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले.