औरंगाबादमधील सभेपासूनच राज्यभर ‘वंचित’ची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 04:47 PM2019-05-24T16:47:24+5:302019-05-24T16:50:02+5:30

त्यानंतर राज्यभर झालेल्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Wanchit Bahujan Aaghadi's wave creates from Aurangabad rally | औरंगाबादमधील सभेपासूनच राज्यभर ‘वंचित’ची हवा

औरंगाबादमधील सभेपासूनच राज्यभर ‘वंचित’ची हवा

googlenewsNext
ठळक मुद्देओवेसी चार दिवस ठाण मांडून बसलेजबिंदा लॉन्सवरील जाहीर सभेचा प्रभाव

औरंगाबाद : औरंगाबाद ही खरं तर कार्यशाळाच होय. इथे केलेले प्रयोग यशस्वी होतात आणि नंतर ते महाराष्ट्रभर पसरतात. तसंच काहीसं एमआयएमचं व नंतर वंचित बहुजन आघाडीचं झालं. २०१४ साली प्रथमत:च एमआयएमने इथे विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आणि औरंगाबाद मध्यमधून इम्तियाज जलील हे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही एमआयएमचे २५ नगरसेवक आले. 

२ आॅक्टोबर २०१८ रोजी औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीची पहिली जाहीर सभा झाली. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांची ही मोठी सभा होती. या सभेपासूनच महाराष्ट्रभर ‘वंचित’ची हवा निर्माण होऊ लागली. आमदार इम्तियाज जलील यांची औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून घोषणा झाली आणि मुस्लिम व दलित समाजाचं झपाट्यानं धु्रवीकरण झालं. हे दोन्ही समाज एक झाले. 

असदोद्दीन ओवेसी यांनी दिले चार दिवस
जलील यांचा प्रचार करण्यासाठी स्वत: असदोद्दीन ओवेसी हे औरंगाबाद मतदारसंघात तळ ठोकून होते. शहरात त्यांनी छोट्या- मोठ्या सभा घ्यायला सुरुवात केली. अनेक  मोहल्ल्यांमध्ये त्यांनी पदयात्रा केल्या. प्रतिसाद मिळत गेला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात त्यांनी शहरातील बुद्धिमंत व जाणकार कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

जबिंदा लॉन्सवरील बाळासाहेब आंबेडकरांची सभा
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ज्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीने निवडणुका लढण्याचा आणि जिंकण्याचा संकल्प केला होता, त्याच लॉन्सवर अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांची संयुक्त जाहीर सभा झाली. त्याच दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. परंतु त्या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि वंचित बहुजन आघाडीच्या या सभेची तुलना केली असता, ‘वंचित’ची सभा किती तरी मोठी राहिली.

एकतर्फी मतदान...
बाळासाहेब आणि असदोद्दीन ओवेसी यांच्यामुळे दलित आणि मुस्लिम समाज खूपच एकवटला गेला आणि एकतर्फी मतदान ज्याला म्हणतात, ती जलील यांना झाली आणि त्याचा परिणाम ते विजयी झाले. वंचित हा एक प्रयोग आहे. त्यात केवळ दलित आणि मुस्लिम हे दोनच समाज अपेक्षित नाहीत. तर ओबीसी, सूक्ष्म ओबीसी, भटके  विमुक्त, ज्यांच्यापर्यंत लोकशाहीची किरणे पोहोचलीच नाहीत, त्यांना या मूळ प्रवाहात आणण्याचा हा संघर्ष होता.

दिग्गज नेत्यांच्या सभेमुळे हवा
औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीची पहिली जाहीर सभा २ आॅक्टोबर २०१८ रोजी झाली. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांची ही मोठी सभा होती. या सभेपासूनच महाराष्ट्रभर ‘वंचित’ची हवा निर्माण होऊ लागली. त्यानंतर राज्यभर झालेल्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Web Title: Wanchit Bahujan Aaghadi's wave creates from Aurangabad rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.