हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला, गाड्यांची तोडफोड 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 08:23 AM2019-10-17T08:23:35+5:302019-10-17T08:57:37+5:30

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री जाधव यांच्या घरावर हल्ला करण्यात आला.

Attack on Harshvardhan Jadhav's house in aurangabad | हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला, गाड्यांची तोडफोड 

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला, गाड्यांची तोडफोड 

googlenewsNext
ठळक मुद्देकन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून  हल्ला करण्यात आला. गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

औरंगाबाद - कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून  हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार असून यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन जाधव यांची जीभ घसरली होती.

जर, मी निवडणूक लढवून मुस्लीम उमेदवाराला मदत केल्याचा तुम्हाला राग आला, तर मग अब्दुल सत्तार तुमचा कोण? असा सवाल जाधव यांनी केला. मात्र त्याचवेळी त्यांनी आक्षेपार्ह विधानही केले. जाधव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाल्याचे मानले जाते. कन्नडमधील एक विश्वासघातकी, ज्यानं भगवा उतरविण्यामध्ये हिरव्याची साथ दिली होती, त्याला आता अजिबात माफी नाही. चुकतोय, लहान म्हणून मी चुका पोटात घालत होतो. पण, भगव्याशी हरामखोरी मी सहन करू शकत नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी चंद्रकांत खैरे यांनी जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. 

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधव यांना 2 लाख 83 हजार मते मिळाली होती. त्यांची ही मते ‘किंगमेकर’ठरली होती. तर विधानसभा निवडणुकीत सुद्धा आपण उतरणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. मात्र जाधव हे राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती.  शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे पर्याय समोर असताना सुद्धा कोणत्याही पक्षासोबत न जाता स्वतंत्र लढण्याचा निर्णय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांच्या संपर्कातून निर्णय घेतला असल्याचे जाधव यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. सत्ताधारी पक्षात असणे व विरोधात असणे यात खूप तफावत आहे. विरोधीपक्षात असलेल्या आमदारांना साधा कारकून सुद्धा ऐकत नाही ही परिस्थिती असून, मी स्वत: मनसेत असताना हे अनुभवलं असल्याचे जाधव म्हणाले आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील विकास कामे व्हावीत यासाठी मुख्यमंत्र्यांशी माझे संबध चांगले असायला पाहिजे, यासाठी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाधव यांनी सांगितलं होतं. 

 

Web Title: Attack on Harshvardhan Jadhav's house in aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.