राशी भविष्य

वृषभ

विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. कुटुंबियांकडून आपणास धनलाभ होईल. प्रणयी जीवनातील कटुता दूर करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागेल. मात्र, वाढीव खर्च करण्याची आपली तयारी असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होईल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा मेहनत करण्याचा आहे. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश झाल्याचे दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. एखाद्या मंत्राच्या मदतीने सुद्धा आपण प्रगती करू शकाल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती किरकोळच असेल. घरात पूजा - पाठाचे आयोजन होईल. बहिणीच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. जुने मित्र भेटतील. आपण मनःशांतीसाठी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ व्यतीत कराल.