राशी भविष्य

धनु

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी व सौभाग्यवर्धक सुद्धा आहे. ज्या कामांची योजना आपण अनेक दिवसांपासून करत होता ती कामे वेळेवर पूर्ण झाल्याने आपण प्रसन्न व्हाल. नोकरी व व्यापार अशा दोन्ही ठिकाणी चांगल्या बातम्या मिळतील. पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून जास्त आर्थिक फायदा होण्याची संभावना आहे. त्याच बरोबर हा आठवडा नव्याने आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा लाभदायी आहे. असे असले तरी कोणत्याही नवीन योजनेत पैसा गुंतविण्यापूर्वी आपल्या शुभचिंतकांचा व आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेण्यास विसरू नये. आपल्याकडे जो काही पैसा आला आहे त्याचा अहंकार इतरां समोर प्रदर्शित करू नका. सर्वांचा योग्य मान राखावा. राजकारणात असलेल्या व्यक्तींना मोठे पद किंवा जवाबदारी देण्यात येऊ शकते. स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आपण जर एखाद्या व्यक्तीस विवाहाची मागणी घातली तर त्यात आपण यशस्वी व्हाल. दांपत्य जीवन सुखद होईल. पूर्वी पासून चालत असलेल्या प्रेम संबंधात सुद्धा माधुर्य व विश्वास वृद्धिंगत होऊ लागेल.