राशी भविष्य

वृश्चिक

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. ह्या आठवड्यात आपल्या जीवनाशी संबंधित अनेक अपूर्ण कामे पूर्णत्वास जात असल्याचे दिसून येईल. आठवड्याची सुरवात एखादा जुना वाद किंवा कोर्ट - कचेरीशी संबंधित बाबी बोलणी करून सोडविण्यासाठी शुभ आहे. ह्या दरम्यान कोणत्याही क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होऊन लोक आपल्याशी सहमत होत असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना प्राप्तीचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. संचित धनाची वृद्धी होईल. कामातील यश व धन लाभ यामुळे आपण उर्जावान व उत्साहित झाल्याचे आपणास जाणवेल. ह्या आठवड्यात आपण अतिरिक्त प्राप्ती होण्यासाठी एखादे नवीन कार्य सुद्धा सुरु करू शकता. आपल्या हाती एखादा मोठा कंत्राट सुद्धा लागू शकतो. हा आठवडा आपल्या उन्नतीस कारणीभूत ठरणारा आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात आपले मन धार्मिक व सामाजिक कार्यात रमेल. विवाहितांसाठी हा आठवडा आपसातील कटुता व वादा पासून सुरु होऊन उत्तरार्धात प्रेमयुक्त व्यवहारात बदल घडवून आणणारा आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रेमिके कडून एखादी भेटवस्तू सुद्धा मिळू शकते. जीवनातील प्रगती होण्यास जोडीदाराची भूमिका महत्वाची असते याची जाणीव आपणास प्रेमिकेच्या जवळ घेऊन जाईल. विद्यार्थ्यांना एखाद्या गुरूंचे मार्गदर्शन लाभेल. त्यांच्या मदतीमुळे ते आपले अध्ययन पूर्ण करू शकतील. ह्या आठवड्यात आपल्या दिनचर्येत जो बदल होईल तो आपणास मनोबल व शारीरिक बल प्रदान करणारा असेल.