या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांनी मानसिक तणावापासून दूर राहणे आवश्यक आहे. ताण वाढल्यास मानसिक दडपण वाढू शकते. व्यावसायिक कामांमध्ये विलंब होऊ शकतो, ज्यामुळे तणाव वाढू शकतो. नोकरीत मात्र उत्तम योग असून प्रमोशनची शक्यता आहे; तसेच ट्रान्सफरची शक्यता मजबूत आहे. इंटरव्ह्यू देणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी आठवडा उत्कृष्ट असून नात्यात नावीन्य आणि जवळीकता वाढेल. वैवाहिक जीवनात मात्र एखादा विषय ताणतणाव वाढवू शकतो, त्यामुळे समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहणार असून वाहन खरेदी किंवा स्वतःवर खर्च करण्याचे योग संभवतात. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत सकारात्मक राहणार आहे, अभ्यासात चांगली प्रगती राहील. एकूणच, मानसिकशांती राखल्यास आठवडा अनुकूल.