तुला राशीच्या व्यक्तिंनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चुकीच्या आहारामुळे किंवा जुन्या आजारांमुळे त्रास वाढू शकतो. रक्तदाब व शुगरच्या रुग्णांनी औषधे वेळेवर घ्यावीत. व्यवसाय किंवा नवीन प्रोजेक्टसंबंधी अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. नोकरी करणाऱ्यांना दुसऱ्या कंपनीतून ऑफर मिळाली तरी घाईने निर्णय घेऊ नका; सध्याच्या नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे. प्रेमसंबंधात तणावाची चिन्हे आहेत, त्यामुळे सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवनात कौटुंबिक समस्यांमुळे वातावरण थोडे तणावपूर्ण होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढेल पण खर्चही वाढतील, त्यामुळे नियोजन आवश्यक. विद्यार्थ्यांना परदेशात किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी संधी मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित. एकूणच, संयम आणि योग्य नियोजन या आठवड्याच्या गुरुकिल्ल्या ठरतील.