मिथुन राशीच्या व्यक्तिंनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे कारण एखादा जुना आजार पुन्हा तोंड वर काढू शकतो. पचनाचे विकार किंवा शारीरिक अशक्ती जाणवू शकते. व्यवसायात खूप मेहनत केल्यानेच मार्ग खुलतील; कामात दिरंगाई नको. नोकरीत सहकाऱ्यांची मदत आवश्यक भासेल आणि आठवडा साधारण पण स्थिर राहील. नोकरी बदलण्याचा विचार सध्या टाळावा. प्रेमसंबंधात शंका किंवा गैरसमजामुळे तणाव वाढू शकतो, म्हणून चर्चेमध्ये स्पष्टता ठेवा. वैवाहिक जीवन मात्र आनंदी आणि सुखद राहील. आर्थिकदृष्ट्या काही ताण येण्याची शक्यता असून कायदेशीर/न्यायालयीन प्रकरणांमुळे खर्च वाढू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत अनुकूल आहे; स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत वेळ घालविण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम परिणाम मिळतील.