Daily Top 2Weekly Top 5

राशी भविष्य

मकर

मकर राशीच्या व्यक्तिंनी या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. श्वसनाचे त्रास, खोकला अथवा थकवा जाणवू शकतो, म्हणून रूटीन चेकअप आवश्यक. व्यवसायात चांगली प्रगती होईल; पूर्वी थांबलेला प्रोजेक्ट पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्साह वाढेल. नोकरीत जबाबदारीने काम केल्यास वरिष्ठांचा विश्वास संपादन करता येईल. प्रेमसंबंधांत रोमँटिक क्षण अनुभवता येतील; प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनही सुखद आणि शांत राहील; परस्पर सल्ल्याने निर्णय घेतल्यास नातं अधिक दृढ होईल. आर्थिक तंगी काहीशी दूर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी ओव्हरकॉन्फिडन्स टाळावा; अन्यथा अपेक्षित परिणाम मिळणार नाही. एकंदरीत, संवाद आणि संयम हे आठवड्याचे मुख्य तत्त्व.