आजचे राशीभविष्य - ७ ऑक्टोबर २०२३, आर्थिक लाभ होतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-10-07 06:54:282023-10-07 07:23:56 | Updated: 2023-10-07 07:23:56

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष -  आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद - विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल.  आणखी वाचा

वृषभ -  आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. सुरुवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. आणखी वाचा

मिथुन  - आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा  

कर्क  - आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील.  आणखी वाचा 

सिंह -  आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. आणखी वाचा 

कन्या -  सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. आणखी वाचा 

तूळ - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी - व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. आणखी वाचा 

वृश्चिक -   नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल. आणखी वाचा 

धनु - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. आणखी वाचा 

मकर -  आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य व मान - सन्मान संभवतात. आणखी वाचा 

कुंभ - आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. आणखी वाचा 

मीन - आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या व प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील.  आणखी वाचा 

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिषराशिभविष्य २०२१
Open in App