आजचे राशीभविष्य - ६ ऑक्टोबर २०२३, भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाढेल, भेट होईल

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-10-06 06:59:392023-10-06 07:25:46 | Updated: 2023-10-06 07:25:46

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष -  आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपले मन चंचन झाल्याने निर्णय घेणे कठीण जाईल व त्यामुळे महत्वाची कामे आपण पूर्ण करू शकणार नाही.  आणखी वाचा

वृषभ -  आज मन स्थिर ठेवून काम न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत.  आणखी वाचा

मिथुन  - आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आपणास प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन व चांगले कपडे घालावयास मिळतील. आणखी वाचा  

कर्क  -  आज आपणास खिन्नता व भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा झाल्याने आपण बेचैन व्हाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा 

सिंह -  आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्ती होईल. मित्रांसह रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल.   आणखी वाचा 

कन्या -  आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने पदोन्नतीची संधी मिळेल. आणखी वाचा 

तूळ -  आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा आपण प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्य लेखन यात गुंतून राहाल. प्रवासाची संधी मिळेल. आणखी वाचा 

वृश्चिक -  आज आपणास प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज आपण अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा 

धनु - आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांचा सहवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे इत्यादी प्राप्त होतील.भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल. त्यांच्याशी रोमांचक भेट होईल.  आणखी वाचा 

मकर -  आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज व्यापार - व्यवसायात मोठे यश मिळाले तरी आपण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायाच्या दृष्टीने केलेल्या भावी योजना यशस्वी होतील. आणखी वाचा 

कुंभ -  आज आपण बौद्धिक क्षमता, लेखनकार्य व नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत व त्यात सातत्याने बदल होत राहील. स्त्रीयांनी आपली वाणी संयमित ठेवावी. आणखी वाचा 

मीन - आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतील. घरातील वातावरण बिघडू नये ह्यासाठी संभाव्य वाद टाळावेत. आईचे आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिषराशिभविष्य २०२१
Open in App