आजचे राशीभविष्य- २० जानेवारी २०२३: आजचा दिवस मध्यम फलदायी; गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता, संयम ठेवावा लागेल...

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-01-20 07:32:13 | Updated: January 20, 2023 07:32 IST

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज आपण गूढ विद्या किंवा एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा

वृषभ- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन ओळखी होतील. एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. परंतु दुपार नंतर वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा

मिथुन- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. आणखी वाचा

कर्क- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. प्रकृती सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा

सिंह- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळे आपणास संयमित राहावे लागेल. धन व कीर्ती यांची हानी संभवते. आणखी वाचा

कन्या- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आज अनेक लाभ होतील. आप्तांकडून काही लाभ संभवतो. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपार नंतर काही ना काही कारणाने आपण चिंतीत व्हाल व त्याचा प्रतिकूल परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होईल. आणखी वाचा

तूळ- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. आणखी वाचा

वृश्चिक- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी सौख्य व समाधान लाभेल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. एखादी चांगली बातमी ऐकीवात येईल. दुपार नंतर मात्र कुटुंबात एखादा गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

धनु- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. स्वभावातील तापटपणा वाढेल. एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल. आणखी वाचा

मकर- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. पत्नी व संतती ह्यांच्याकडून काही फायदा संभवतो. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या काही सुखद प्रसंगामुळे आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा

कुंभ- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान - सन्मान होतील. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. स्वास्थ्य ठीक राहील. आणखी वाचा

मीन- आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास संभवतात. परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिष
Open in App