आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२५: आर्थिक लाभ होतील, मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-02-21 07:24:10 | Updated: February 21, 2025 07:24 IST

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - 21 फेब्रुवारी, 2025 शुक्रवारी आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ व रहस्यमय विद्येची गोडी वाटेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नवीन कामाचा आरंभ करण्यास अनुकूल नाही. प्रवासात अचानक संकटे येतील. क्रोध व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा

वृषभ - आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रां कडून आनंददायी बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापार्‍यांना व्यापारात वृद्धी होईल. आणखी वाचा 

मिथुन  - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. पण केलेला खर्च वाया जाणार नाही. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभावात रागाचे प्रमाण मात्र वाढेल. आणखी वाचा 

कर्क  - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. मानसिक अशांतता व उद्वेगाने मन भरून जाईल. खिन्नता जाणवेल. पोटदुखी, अपचन, अजीर्ण इ. व्याधींमुळे हैराण व्हाल. अचानक पैसा खर्च करावा लागेल. प्रिय व्यक्तीकडून मन दुखावले जाईल किंवा अबोला धरला जाईल.  आणखी वाचा 

सिंह - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनावर वैचारिक नकारात्मकतेचा पगडा राहील. संपत्तीच्या कागदपत्रावर सही करताना दक्षता घ्यावी.  आणखी वाचा 

कन्या - आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय व मित्रपरिवार ह्यांच्याशी असलेल्या संबंधात गोडवा वाढेल. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल.  आणखी वाचा 

तूळ  -   आज आपले मनोबल कमी राहिल्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणे हितावह राहील. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबियांशी होणारे संभाव्य वाद टाळू शकाल. आणखी वाचा 

वृश्चिक -  आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा - समाधानाचे वातावरण राहील. मित्र व स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. आणखी वाचा

धनु -  आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. आरोग्य बिघडेल. बोलणे व वागणे यांवर संयम ठेवावा लागेल. एखादी दुर्घटना संभवते. पैसा जास्त प्रमाणात खर्च होईल. आणखी वाचा 

मकर - आजचा दिवस लाभदायी आहे. सगे - सोयरे व मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहेच्छुकांना अपेक्षित जोडीदार मिळेल. व्यापारात सुद्धा दिवस लाभदायी ठरेल. सहल - प्रवास होतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा 

कुंभ  - आज शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त होतील. मित्र व कुटुंबीयांसह आनंददायी प्रवास कराल. आज दिवसभर कामे सहजपणे यशस्वी होत असल्याचा अनुभव येईल. आणखी वाचा 

मीन -आज वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका व मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. प्रवास यशस्वी होतील. आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App