आजचे राशीभविष्य - ३० डिसेंबर २०२३; काही शुभ समाचार व आर्थिक लाभ सुद्धा मिळतील, धन भांडारात वाढ होईल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-12-30 07:25:52 | Updated: December 30, 2023 07:25 IST

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष

आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज आपला स्वभाव हळवा झाल्याने कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावतील. आईच्या प्रकृतीमुळे आपण खूप चिंतित व्हाल. आपला स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण व झोप ह्यात अनियमितता येईल. आणखी वाचा 

वृषभ

आज चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज आपण भावुक व संवेदनशील झाल्याने कल्पनाशक्ती व सृजनशक्ती डोके वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र ह्यात आज आपण काम करू शकाल. आणखी वाचा

मिथुन

आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज सुरवातीच्या त्रासा नंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे आपले कीती तरी त्रास कमी होऊ लागतील. आणखी वाचा

कर्क

आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्या कडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. आणखी वाचा

सिंह

 आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपण कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर व बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा

कन्या

आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील व मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

तूळ

 आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिक

आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास होईल. आणखी वाचा

धनु

आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते. आणखी वाचा

मकर

आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. ह्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल. आणखी वाचा 

कुंभ

आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस कामात यश मिळविण्यासाठी अनुकूल आहे. केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तन मनाला उत्साह जाणवेल. आणखी वाचा 

मीन

आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश व प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. आणखी वाचा

टॅग्स :
Open in App