आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2024-05-06 06:56:152024-05-06 06:57:01 | Updated: 2024-05-06 06:57:01

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Open in app

मेष - आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मनाची एकाग्रता कमी झाल्याने मनास दुःख होईल. मानसिक ताण जाणवेल. गुंवणूकीतून फारसा लाभ होणार नसल्याने आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. आणखी वाचा

वृषभ - आज घर व संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. नवीन मैत्री सुद्धा होईल. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल.  आणखी वाचा

मिथुन- आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल.  आणखी वाचा

कर्क- आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. शारीरिक दृष्टया आळस व मरगळ जाणवेल. पोटाचा त्रास संभवतो. कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही. संतती विषयक चिंता वाढेल. आणखी वाचा

सिंह- आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. मानसिक व शारीरिक त्रास वाढतील. त्यामुळे प्रकृती बिघडेल. आणखी वाचा

कन्या - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे - पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल.  आणखी वाचा

तूळ- आज आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख - शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभाव उग्र बनेल. सबब वाणीवर नियंत्रण ठेवा.  आणखी वाचा

वृश्चिक-  आज आपल्यातील मानसिक हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल साधावा लागेल. अभ्यास व कारकीर्द ह्या संबंधी कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती व साहित्य निर्मिती ह्यात नावीन्य दिसेल.  आणखी वाचा

धनु- आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद - विवाद टाळणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपार नंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल. आणखी वाचा

मकर- आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ व स्थिर विचार ह्यांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपार नंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ होईल.  आणखी वाचा

कुंभ- आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या - पिण्यात संयम बाळगा. दुपार नंतर वैचारिक स्थैर्य लाभेल.  आणखी वाचा

मीन- आज आपल्या घरी एखादे मंगल कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्ये तडीस जातील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजचा दिवस नवीन कामे हाती घेण्यास शुभ आहे. दुपार नंतर संतापी वृत्ती वाढीस लागेल. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिष
Open in App