Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल, अचानक धनलाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-02-26 07:19:43 | Updated: February 26, 2025 07:19 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष-  आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. आणखी वाचा

वृषभ-  आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील.आणखी वाचा

मिथुन- आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल.आणखी वाचा

कर्क- आज चंद्र 26 फेब्रुवारी, 2025 बुधवारी मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल.आणखी वाचा 

सिंह- आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. आणखी वाचा 

कन्या-  आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील.आणखी वाचा 

तूळ - आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्टया आपण व्यस्त राहाल. माते विषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. शक्य असेल तर प्रवास टाळा.आणखी वाचा 

वृश्चिक- आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल. आणखी वाचा 

धनु- आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही.आणखी वाचा 

मकर- आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा 

कुंभ- आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज कोणाला जामीन राहणे, पैसे देणे - घेणे करू नका. खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

मीन- आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल.आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिष
Open in App