Municipal ELection Result: अकोल्यात नव्या समीकरणांची तयारी, कोण कोणासोबत आघाडी करण्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:29 IST2026-01-16T11:25:49+5:302026-01-16T11:29:29+5:30

Akola Municipal Election Results 2026: निकाल जाहीर होण्याआधीच सर्वच प्रमुख पक्षांनी इतर पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे. 

Municipal Election Result: Preparations for new equations in Akola, who is preparing to form an alliance with whom? | Municipal ELection Result: अकोल्यात नव्या समीकरणांची तयारी, कोण कोणासोबत आघाडी करण्याच्या तयारीत?

Municipal ELection Result: अकोल्यात नव्या समीकरणांची तयारी, कोण कोणासोबत आघाडी करण्याच्या तयारीत?

अकोला महापालिकेच्या ८० जागांचे कल येण्यास सुरूवात झाली आहे. निकाल लागण्यापूर्वीच राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आपापले अंदाज मांडत प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत आघाडी करणार याबद्दलच्या भूमिका मांडल्या आहेत. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासोबत युती करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकत्र लढत आहेत. भाजपाचे नेते, आमदार रणधीर सावरकर यांनी भाजपा ५० जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला १४ जागा मिळतील असा दावा पक्षाचे शहराध्यक्ष विजय देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे भाजपाला बहुमतासाठी काही जागांची गरज पडली, तर शिंदेसेनेसोबत आघाडी केली जाऊ शकते. शिंदेसेनेला १६ जागा मिळू शकतात, असा अंदाज पक्षाचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस कोणासोबत जाणार?

महापालिका निवडणुकीचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार साजित खान पठाण यांनी केले आहे. काँग्रेसला या निवडणुकीत ३२ जागा मिळतील असा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेस समविचार पक्षांसोबत आघाडी करेल असेही त्यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसला आघाडी करण्यासाठी काही पक्षांचे पर्याय खुले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी पक्षाला २० जागा मिळतील असा दावा केला आहे. त्याचबरोबर भाजपा वगळता इतर समविचारी पक्षांसोबत आम्ही जाऊ असेही त्यांनी म्हटले आहे. 

काँग्रेससाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षाचाही पर्याय खुला आहे. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी आम्हाला ७ जागा मिळतील असे म्हटले आहे. त्याचबरोबर उद्धवसेनेचा पर्यायही असून पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी उद्धवसेनेला १७ जागा मिळतील असा दावा केला आहे. मात्र, निकालानंतर आघाडीबद्दलचा निर्णय घेऊ असेही त्यांनी म्हटले आहे. 

आतापर्यंतचे कल काय?

अकोला महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, ११ वाजेपर्यंतच्या कलानुसार, भाजपाने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. अकोल्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकत्र लढत आहेत. आतापर्यंत भाजपा २९ जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४ जागांवर आघाडीवर आहे. 

उद्धवसेना सहा जागांवर आघाडीवर आहे, तर मनसेचे अद्याप खाते उघडता आलेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) एकत्र लढत असून, राष्ट्रवादी एका जागेवर आघाडीवर आहे. 

Web Title : अकोला नगर निगम चुनाव: नए गठबंधन बन रहे हैं, कौन किसके साथ साझेदारी करेगा?

Web Summary : अकोला नगर निगम चुनाव के नतीजे गठबंधन की चर्चाओं को जन्म देते हैं। भाजपा ने राकांपा (अजित पवार) के साथ गठबंधन का संकेत दिया। कांग्रेस, वीबीए और राकांपा (शरद पवार) समेत विकल्पों पर विचार कर रही है, जबकि उद्धव सेना नतीजे के बाद फैसले पर विचार कर रही है। शुरुआती रुझानों में भाजपा आगे।

Web Title : Akola Municipal Election: New Alliances Forming, Who Will Partner With Whom?

Web Summary : Akola's municipal election results spark alliance talks. BJP hints at NCP (Ajit Pawar) tie-up. Congress considers options, including VBA and NCP (Sharad Pawar), while Uddhav Sena weighs post-result decisions. Early trends show BJP leading.