Akola Lok Sabha Results 2024 : अनुप धोत्रे 40 हजारांनी आघाडीवर, विजय सुनिश्चित भाजपची फटाक्यांची आतिषबाजी सुरू
By नितिन गव्हाळे | Updated: June 4, 2024 17:44 IST2024-06-04T17:43:29+5:302024-06-04T17:44:39+5:30
Akola Lok Sabha Results 2024 : भाजप कार्यकर्त्यांनी सुरू केला जल्लोष; काँग्रेसच्या पोटात पसरला सन्नाटा

Anup Dhotre is leading by 40 thousand, BJP's victory is assured, fireworks start
नितीन गव्हाळे,
Akola Lok Sabha Results 2024 : अकोला लोकसभा मतदार संघातील मतमोजणी च्या 28 व्या फेरीची आकडेवारी समोर आली असून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे 40 हजार 12 मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील हे चार लाख 13 हजार 854 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
मतमोजणीच्या सुरुवातीला 14 फेऱ्यांपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांनी 16 हजारापर्यंत आघाडी घेतली होती. परंतु त्यांच्या मतांचे अंतर कमी कमी होत गेले आणि भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी त्यांच्यावर आघाडी घेतली. आतापर्यंत 27 फेऱ्या झाल्या असून या फेरीपर्यंत अनुप धोत्रे यांनी चार लाख 52 हजार 713 मते घेत पहिला क्रमांक पटकावला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे अभय पाटील यांनी चार लाख 12 हजार 887 मते घेतली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उमेदवार एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख 74 हजार 400 मतांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपच्या उमेदवाराने 39 हजार 736 मतांची आघाडी मिळवली असल्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. तसेच जय श्रीराम व हर हर महादेव असे नारे देण्यास सुरुवात केली असून विजयाचा लवकरच गुलाल उधळण्यात येणार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या गोटात जमतं का काही आपलं
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील हे 14 व्या फेरीपर्यंत आघाडीवर होते परंतु अचानक पंधराव्या घरी बसून ते माघारले आणि भाजपचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांनी अनपेक्षित मुसंडी मारत त्यांच्यावर 39 हजार 736 मतांनी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे उत्साहात असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक नाराज झाले आहेत. मोबाईल आहे आता आपल्या उमेदवाराचं काही जमतं का असे विचार ना सोशल मीडियावरील काँग्रेसच्या ग्रुप वर होताना दिसत आहे.
कार्यकर्ते म्हणतात धीर सोडू नका
काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील अकोल्यात काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, अद्याप मतमोजणीच्या पाच फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे धीर सोडू नका विजय आपलाच आहे असा धीर काँग्रेसच्या सोशल मीडिया ग्रुप वर कार्यकर्ते एकमेकांना देत असल्याचे दिसून येत आहे.