धक्कादायक! विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या महिला नेत्याकडून उकळले दीड लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 15:20 IST2025-03-14T15:20:38+5:302025-03-14T15:20:59+5:30
बालराजे पाटील यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

धक्कादायक! विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसच्या महिला नेत्याकडून उकळले दीड लाख
अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीच्यावेळी उमेदवारी देतो, असे सांगून दीड लाख रुपये घेतले. मात्र उमेदवारी न देता काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक मंगला भुजबळ यांची फसवणूक केली. याप्रकरणी बालराजे पाटील यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पक्षाकडून उमेदवारी मिळवून देतो, असे सांगून बालराजे पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी भुजबळ यांचा विश्वास संपादन केला.
त्यांच्याकडून उमेदवारीसाठी म्हणून दीड लाख रुपये घेतले. परंतु, उमेदवारी दिली नाही. तसेच त्यांनी भुजबळ यांचे पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे भुजबळ यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, या फिर्यादीवरून बालराजे पाटील यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत.