Lok Sabha Election 2019: डॉ.सुजय विखे, संग्राम जगताप यांनी घेतले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:39 IST2019-03-29T17:35:24+5:302019-03-29T17:39:07+5:30
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या दिवशी एकूण २३ जणांनी ३५ अर्ज नेले. दरम्यान, पहिल्या दिवशी एकूण २१ जणांनी ३९ अर्ज नेले होते.

Lok Sabha Election 2019: डॉ.सुजय विखे, संग्राम जगताप यांनी घेतले अर्ज
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या दिवशी एकूण २३ जणांनी ३५ अर्ज नेले. दरम्यान, पहिल्या दिवशी एकूण २१ जणांनी ३९ अर्ज नेले होते. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही कोणीच अर्ज दाखल केला नाही.
भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड व शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांनी प्रत्येकी दोन अर्ज नेले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी अशोक शेडाळे यांनी ३ अर्ज नेले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना गुरुवारी जारी झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरु झाली. पहिल्या दिवशी २१ जणांनी ३९ अर्ज नेले. शुक्रवारी दुसºया दिवशी सकाळी अकरापासून अर्ज उपलब्ध झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत २१ जणांनी ३९ अर्ज नेले.लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेचे कामकाज सुरू आहे.
दुस-या दिवशी अर्ज नेणाऱ्यांची नावे (कंसात अर्जांची संख्या)
प्रा. भानुदास बेरड (डॉ. सुजय विखे यांच्यासाठी (२)
दिलीप सातपुते (डॉ. सुजय विखे यांच्यासाठी (२)
अशोक शेडाळे (संग्राम जगताप यांच्यासाठी (३)
विजय मोहित, श्रीगोंदा (अॅड. कमल सावंत यांच्यासाठी (३)
श्रीराम येंडे (नगर (२),
गौतम घोडके (श्रीगोंदा) (१)
एकनाथ गांगुर्डे (नालेगाव) (१)
आसाराम पालवे (माळीवाडा)(१)
ज्ञानदेव सुपेकर (कुळधरण, कर्जत (१)
धीरज बताडे (पाथर्डी) (१)
गोरक्ष चितळे (पाथर्डी (१)
लक्ष्मण चितळे (नेवासा (१)
नितीन थोरात (सावेडी) (१)
रामकिसन ढोकणे (उंब्रे, ता. राहुरी (२)
अविनाश देशमुख (संजय सावंत यांच्यासाठी) (१)
एकनाथ गायकवाड (बागडेमळा, नगर (२)
कारभारी धाडगे (नजीक चिंचोली, ता. जि. नगर (१)
फारूख शेख (बोल्हेगाव, नगर (३)
अण्णासाहेब बाचकर (राहुरी) (२)
मधुकर साळवे (राहुरी (१)
उमाशंकर यादव (बोल्हेगाव, नगर (१)
जयराम औटी (मोकळ ओव्हळ, ता. राहुरी (१)
सुभाष पोखरकर, संगमनेर (२)