नरेंद्र मोदींच्या सभेत केजरीवालांचा फोटो झळकावला, आपचे कार्यकर्ते ताब्यात
By अण्णा नवथर | Updated: May 7, 2024 20:45 IST2024-05-07T20:34:49+5:302024-05-07T20:45:47+5:30
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बसलेल्या कार्यकत्यांनी जेल का जबाब वोटसे, असा मुजकूर लिहिलेला केजरीवाल यांचा जेलमधील फोटो झळकावला.

नरेंद्र मोदींच्या सभेत केजरीवालांचा फोटो झळकावला, आपचे कार्यकर्ते ताब्यात
अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारी अहमदनगर येथे झालेल्या सभेत आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो झळकविला. त्यामुळे सभेत काही क्षणासाठी गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी तातडीने संबंधितांना ताब्यात घेतले.
राजू अघाव, असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यासह आणखी एकाला ताब्यात घेऊन तोफखाना पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बसलेल्या कार्यकत्यांनी जेल का जबाब वोटसे, असा मुजकूर लिहिलेला केजरीवाल यांचा जेलमधील फोटो झळकावला. त्यामुळे सभेत काही क्षणासाठी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत आपच्या कायकत्यांना ताब्यात घेऊन सभेतून बाहेर काढल्याने वताावरण निवळले.