Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये यंदा किती पाणीसाठा? कोणत्या विभागात सर्वाधिक पाणी?

गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये यंदा किती पाणीसाठा? कोणत्या विभागात सर्वाधिक पाणी?

How much water is stored in the dams of the state this year compared to last year? Which department has the highest water storage? | गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये यंदा किती पाणीसाठा? कोणत्या विभागात सर्वाधिक पाणी?

गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये यंदा किती पाणीसाठा? कोणत्या विभागात सर्वाधिक पाणी?

maharashtra dam water storage जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण या सहा विभागांत ३ हजार ११ धरणे आहेत.

maharashtra dam water storage जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण या सहा विभागांत ३ हजार ११ धरणे आहेत.

पुणे : राज्यातील सुमारे तीन हजारांहून अधिक धरणांमध्ये या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ६४.४१ टक्के इतका पाणीसाठा असून, गेल्या वर्षाच्या ५७.२२ टक्के साठ्याच्या तुलनेत हा साठा ७.१९ टक्क्यांनी अधिक आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पाऊसमान चांगले राहिल्याने धरणांमधीलपाणीसाठा चांगला आहे. सर्वाधिक पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर विभागात असून, सर्वांत कमी कोकण विभागात आहे.

राज्यातील पाणीसाठा
प्रदेश - मागील वर्षीचा - सध्याचा पाणीसाठा

नागपूर - ५१.९९% - ६५.८२%
अमरावती - ५८.९९% - ६५.१५%
छ. संभाजीनगर - ५५.८९% - ६६.५८%
नाशिक - ५८.०४% - ६६.२७%
पुणे - ५७.५२% - ६२.९६%
कोकण - ६१.९७% - ६०.६१%
एकूण साठा - ५७.२२% - ६४.४१%

मागील वर्षी चांगला पाऊस
◼️ जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण या सहा विभागांत ३ हजार ११ धरणे आहेत.
◼️ त्यामध्ये मोठे प्रकल्प १३८, मध्य प्रकल्प २६२ आणि लघू प्रकल्प २ हजार ६११ आहेत. राज्यात मागील वर्षी मेपासूनच पावसाला सुरुवात झाली.

नियोजनपूर्वक वापर गरजेचा
◼️ कायमच दुष्काळग्रस्त असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील धरणांमध्येसुद्धा सध्या पाणीस्थिती खूपच चांगली आहे.
◼️ पाण्याचा नियोजनपूर्वक वापर केला तर पावसाळ्याच्या दिवसांपर्यंत पाणी पुरेल, अशी अपेक्षा विभागाला आहे.

अधिक वाचा: मनाप्रमाणे जास्त क्षमतेचा सोलार प्रकल्प बसविण्याचा मार्ग झाला बंद; आता 'हा' नवा नियम लागू

Web Title : महाराष्ट्र के बांध: पिछले वर्ष की तुलना में वर्तमान जल भंडारण, क्षेत्रवार विश्लेषण

Web Summary : महाराष्ट्र के बांधों में 64.41% जल भंडारण है, जो पिछले वर्ष की तुलना में 7.19% अधिक है। छत्रपति संभाजीनगर विभाग में सबसे अधिक और कोंकण में सबसे कम भंडारण है। अच्छी बारिश से नागपुर, अमरावती, नासिक और पुणे क्षेत्रों में जल स्तर में सुधार हुआ है। सूखाग्रस्त क्षेत्रों के लिए जल संरक्षण महत्वपूर्ण है।

Web Title : Maharashtra Dams: Current Water Storage vs. Last Year, Region-wise Analysis

Web Summary : Maharashtra's dams have 64.41% water storage, 7.19% higher than last year. The highest storage is in Chhatrapati Sambhajinagar division, and the lowest is in Konkan. Good rainfall has improved water levels in Nagpur, Amravati, Nashik and Pune regions. Water conservation is crucial for drought-prone areas.