Raigad: तीन महिने मुंबई गेटवे ते मांडवा जलवाहतूक बंद राहणार

By निखिल म्हात्रे | Published: May 17, 2024 08:31 PM2024-05-17T20:31:54+5:302024-05-17T20:32:14+5:30

Raigad News: वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. मात्र पावसाळा सुरु होणार असल्यानं या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे.

Raigad: Water traffic from Mumbai Gateway to Mandwa will be closed for three months | Raigad: तीन महिने मुंबई गेटवे ते मांडवा जलवाहतूक बंद राहणार

Raigad: तीन महिने मुंबई गेटवे ते मांडवा जलवाहतूक बंद राहणार

- निखिल म्हात्रे 
अलिबाग - वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. मात्र पावसाळा सुरु होणार असल्यानं या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यामुळे आता मांडवाहून मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गानेच मुंबई गाठावी लागणार आहे. परिणामी लाटांवर हेलकावे खात मांडवा घाठण्यासाठी काही दिवस ब्रेक घ्यावा लागेल. महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने प्रवासी जलवाहतूक कंपन्यांना ही वाहतूक बंद ठेवण्याबाबत पत्र दिलं आहे. खबरदारी म्हणून पावसाळ्यात जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यानुसार 26 मे पासून 31 ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या जलवाहतुकीला अनेकांची प्रसंती पाहायला मिळाली आहे. रायगड किंवा अलिबागमध्ये जाणाऱ्यांना स्वस्त दरात आणि कमी वेळेत मुंबई गाठणं या जलवाहतुकीमुळे शक्य होतं. त्याचप्रमाणे असंख्य पर्य़टकही या जलवाहतुकीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पीएनपी, मालदार, अजंठा, अपोले या कंपन्यांच्या बोटी मांडवा ते गेट वे जलवाहतूक मार्गावर प्रवासी सेवा देतात. पावसाळ्याचे चार महिने ही सेवा बंद केली होते. पुढच्या आठ दिवसांनी ही जलवाहतूक खबरदारीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात बंद राहणाऱ्या या जलवाहतुकीचा परिणाम अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही होतो. मुंबईकरांची मांडवा किनाऱ्याला पर्यटनासाठी पसंती असते. मांडवा इथं पर्यटनाच्या दृष्टीनं अनेक गोष्टींचा विकास झाला आहे. वेगवेगळ्या समुद्री खेळांसह निवांत आणि शांत वातावरणासाठी हाकेच्या अंतरावर असलेल्या मांडवाला पर्यटकांची पसंती असते.

आठ ते नऊ महिन्यांत जवळपास दर दिवशी हजार ते दीड हजार प्रवाशी पर्यटनासाठी जलवाहतुकीद्वारे इथं मुंबईहून येत असतात. मात्र जलवाहतूक बंद असल्यानंतर अलिबागसह मांडवा इथल्या पर्यटनावरही परिणाम जाणवतो. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच मार्गावरील जलवाहतूक या दरम्यान बंद राहणार असली तरी मांडवा ते भाऊचा धक्का या मार्गावर सुरू असणारी रो रो सेवा तसेच दिघी ते आगरदांडा मार्गावरील जंगल जेटी वाहतूक मात्र सुरूच राहणार आहे.

Web Title: Raigad: Water traffic from Mumbai Gateway to Mandwa will be closed for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड