"अजित पवारांनी मला एबी फॉर्म दिला पण..." रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 23, 2024 12:54 PM2024-04-23T12:54:28+5:302024-04-23T12:55:39+5:30

रोहित पवार महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात मध्ये आले होते....

"Ajit Pawar gave me AB form but..." Rohit Pawar's criticism of Ajit Pawar | "अजित पवारांनी मला एबी फॉर्म दिला पण..." रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

"अजित पवारांनी मला एबी फॉर्म दिला पण..." रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

पिंपरी : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांनी मला एबी फॉर्म दिला होता. पण मी अपक्ष लढणार नव्हतो. यात ५० टक्के खरे आणि ५० टक्के खोटी माहिती आहे. मात्र, काही दिवसात अजित पवार १०० टक्के खोटं बोलतील. अजित पवार आणि सुनिल शेळके यांना चॅलेंज देतो. त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घ्यावी मीही पत्रकार परिषदेला उभे राहून समोरासमोर काय ते होऊन जाऊ द्या, असे चॅलेंज रोहित पवार यांनी अजित पवार यांना दिले.

रोहित पवार महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात मध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

पार्थ पवारांच्या पराभवाचा कार्यकर्तेच बदला घेतील...

पार्थ पवारांचा पराभव केलेल्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार येतात. म्हणजे त्यांची काहीतरी मजबुरी असेल. ज्या उमेदवाराने पार्थ पवारांचा पराभव केला. त्याला पाडल्याशिवाय मी राहणार नाही. कारण ज्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला होता आता तेही सध्याच्या उमेदवाराचा प्रचार करत नाहीत, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला. 

नेत्यांच्या पोरांनीही सुरक्षा

रोहित पवार म्हणाले, खर तर पार्थ पवार यांना प्लस द्यायला हवी होती. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेत्यांना सुरक्षा देतात. त्यांच्या पोरांना सुरक्षा देतात. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली त्याकड त्यांचे लक्ष नाही. आम्ही सर्व्हे केला त्यात संजोग वाघेरे यांच्या बाजूने वातावरण आहे. सगळीकडे मशालचे वातावरण आहे.त्यामुळे संजोग वाघेरे हेच मावळचे पुढचे खासदार असतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

Web Title: "Ajit Pawar gave me AB form but..." Rohit Pawar's criticism of Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.