जानकर- मोदी एकत्र, आता परभणीच्या विकासाला कुणीही थांबवणार नाही: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 04:41 PM2024-04-20T16:41:41+5:302024-04-20T16:45:06+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मराठावाडा दौऱ्यावर होते. मोदी यांनी पहिली सभा नांदेडमध्ये तर दुसरी सभा परभणीत घेतली.

mahadev Jankar- narendra Modi together now nobody will stop the development of Parbhani says Devendra Fadnavis | जानकर- मोदी एकत्र, आता परभणीच्या विकासाला कुणीही थांबवणार नाही: देवेंद्र फडणवीस

जानकर- मोदी एकत्र, आता परभणीच्या विकासाला कुणीही थांबवणार नाही: देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मराठावाडा दौऱ्यावर होते. मोदी यांनी पहिली सभा नांदेडमध्ये तर दुसरी सभा परभणीत घेतली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते, यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत भाजपा सरकारच्या कामांची माहिती दिली. 

"आता परभणीचा विकास कोणीही थांबवू शकत नाहीत, कारण मोदीजींच्या नेतृत्वात महादेव जनकर यांना उमेदवारी दिली आहे. मोदीजी फकीर आहेत आणि जानकरही फकीर आहेत. आता हे दोन लोक एकत्रित आल्यानंतर या परभणीला कोणीही थांबवू शकत नाही. मोदीजींनी करोडो लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. अनेकांचं परिवर्तन केलं. परभणीत अनेक प्रकल्पांना आम्ही पैसे दिले, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

रोहित पवार यांनी तीनवेळा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला होता; अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा गौप्यस्फोट

"महादेव जानकर साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या खजानाची किल्ली आहे. आम्ही त्यांचा शब्द मोडू शकत नाही. महादेव जानकर जमिनीवरचे आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

"जसं अमेठीतून पळाले, तसं वायनाड सोडावं लागेल"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "काँग्रेसच्या राजकुमारांना वायनाडमध्ये संकट दिसत आहे. त्यांना जसं अमेठीतून पळून जावं लागलं तसंच वायनाड सोडावं लागेल" असं म्हणत निशाणा साधला आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. 2019 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला.

महाराष्ट्रातील नांदेड येथे जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "काल देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ज्यांनी मतदान केलं, विशेषत: ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं त्यांचं मी अभिनंदन करतो. मतदानानंतर बूथ स्तरापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी केलेलं विश्लेषण आणि जी माहिती मिळत आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात एनडीएच्या बाजूने एकतर्फी मतदान झाल्याचा विश्वास पक्का होत आहे."

Web Title: mahadev Jankar- narendra Modi together now nobody will stop the development of Parbhani says Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.