असदुद्दीन ओवैसींनी केली प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची घोषणा, या मतदारसंघातील समिकरण बदलणार?  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:54 AM2024-04-17T10:54:49+5:302024-04-17T10:54:49+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी अकोला (Akola Lok Sabha Constituency) येथून निवडणूक लढवत असलेल्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Asaduddin Owaisi announced his support to Prakash Ambedkar, will the equation change in this constituency? | असदुद्दीन ओवैसींनी केली प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची घोषणा, या मतदारसंघातील समिकरण बदलणार?  

असदुद्दीन ओवैसींनी केली प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची घोषणा, या मतदारसंघातील समिकरण बदलणार?  

महाविकास आघाडीसोबतची जागावाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. तसेच त्यांनी काही मतदारसंघांतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची नावेही जाहीर केली होती. दरम्यान, स्वबळावर लढत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांना त्यांच्या जुन्या सहकाऱ्याने पाठिंबा जाहीर केला आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अकोला येथून निवडणूक लढवत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ओवेसींनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची ताकद निश्चितपणे वाढणार आहे. याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित यांच्यात आघाडी झाली होती. मात्र ही आघाडी काही महिन्यांतच तुटली होती. 

प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची घोषणा करताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, दलितांनाही नेतृत्व मिळालं पाहिजे. मी अकोल्यामधील एमआयएमच्या मतदारांना प्रकाश आंबेडकर यांना मतदान करण्याचं आवाहन करत आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. तसेच अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांना धक्का देऊ शकतात, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकाही मुस्लिम नेत्याला उमेदवारी दिलेली नाही. या मुद्द्यावरून आता वंचित आणि एमआयएमने मविआला घेरण्यास सुरुवात केली आहे. तसेच मुस्लिम मतदार लक्षणीय असलेल्या ठिकाणी त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी प्रयत्नशील आहेत.   

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Asaduddin Owaisi announced his support to Prakash Ambedkar, will the equation change in this constituency?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.