NDA अन् INDIA आघाडीच्या मतांमध्ये घट; महाराष्ट्रात युतीसह मविआलाही टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 08:12 PM2024-04-04T20:12:58+5:302024-04-04T20:14:55+5:30

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीनिमित्त एका हिंदी वृत्तवाहिनीकडून ओपिनियन पोल घेण्यात आला असून त्यात जनतेचा मूड लक्षात घेतला आहे. यातील आकडेवारी पाहून इंडिया आणि एनडीए आघाडीत काटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत. 

Loksabha Election 2024: Decline in votes of NDA and INDIA alliance, Tensions for Mahayuti, Mahavikas Aghadi in Maharashtra | NDA अन् INDIA आघाडीच्या मतांमध्ये घट; महाराष्ट्रात युतीसह मविआलाही टेन्शन

NDA अन् INDIA आघाडीच्या मतांमध्ये घट; महाराष्ट्रात युतीसह मविआलाही टेन्शन

मुंबई - Loksabha Election Opinion Poll ( Marathi News ) महाराष्ट्राच्या निवडणूक आखाड्यात NDA महायुती आणि INDIA महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्ष उमेदवार घोषित करतोय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना घेरण्याची तयारी करत आहेत. मात्र राज्यातील जनतेचा मूड काय आहे? त्यांना काय वाटतं? ते कुणाला बहुमत देतील? यासारख्या विविध प्रश्नावर ABP-C Voter नं सर्व्हे केला आहे. त्यातील ओपिनियन पोलमधून समोर आलेले आकडे पाहून महायुतीसह मविआलाही टेन्शन येण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील महायुतीत भाजपासह एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, रामदास आठवलेंची आरपीआय, महादेव जानकरांचा रासप सहभागी आहे. तर इंडिया प्रणित महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना सहभागी आहे. मतांच्या टक्केवारीकडे पाहिले तर याठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीत यांच्यात काटे की टक्कर होताना दिसते. दोन्हीही युती, आघाडी समसमान ४१ टक्के मते घेण्याचा अंदाज आहे. त्यात १८ टक्के मते ही अन्य पक्षांच्या खात्यात जाऊ शकतात. 

महिन्याच्या तुलनेत कोणाला किती मते?
 NDA INDIA AllianceOther 
एप्रिल४१ टक्के४१ टक्के१८ टक्के
मार्च४३ टक्के४२ टक्के१५ टक्के

मार्च आणि एप्रिल महिन्याच्या आकडेवारीची तुलना केली तर, एनडीए महायुतीला २ टक्के मतांचा फटका बसतोय. एनडीएला मार्चमध्ये ४३ टक्के मतांचा अंदाज होता. हा आकडा एप्रिलमध्ये घसरून ४१ टक्क्यांवर आला आहे. तर इंडिया महाविकास आघाडीलाही १ टक्क्यांचं नुकसान होताना दिसते. मार्चमध्ये ४२ टक्के तर एप्रिलमध्ये ४१ टक्के मते महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज आहे. तर अन्य पक्षांच्या खात्यात ३ टक्के मतांचा फायदा होताना दिसतोय. मार्चमध्ये इतरांच्या खात्यात १५ टक्के मते होती जो आकडा आता एप्रिलमध्ये १८ टक्क्यांवर पोहचला आहे.

Web Title: Loksabha Election 2024: Decline in votes of NDA and INDIA alliance, Tensions for Mahayuti, Mahavikas Aghadi in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.